OnePlus ही मोबाईल उत्पादक कंपनी असून आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत असते. असाच एक स्मार्टफोन वनप्लस लवकरच भारतात लाँच करणार आहे. OnePlus 11R 5G हा लवकरच लाँच होणार आहे. फोनच्या फीचर्ससोबत त्याची किंमत देखील समोर आली आहे. या स्मार्टफोनला आधीच BIS सर्टिफिकेट मिळाले आहे. या फोनचे उत्पादन भारतात सुरु झाले आहे. कंपनीने या फोनच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. याचे काही फीचर्स आणि किंमत लीक झाली आहे.
काय आहेत फीचर्स ?
या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले येतो. हे डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 प्रोसेसरद्वारे संलग्न आहे. यात १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. या स्मार्टफोनचा कॅमेरा ५० प्लस १२प्लस २ मेगापिक्सलचा कॅमेरा येतो. ट्रिपल रियर कॅमेरा येतो. तसेच सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सलचा कॅमेरा येतो. तसेच या डिव्हाइसमध्ये १०० वॅटचे चार्जिंग सपोर्ट येतो. या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता ५,००० mAh इतकी आहे.
काय असणार किंमत ?
वनप्लसच्या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजसाठी ३५,००० रुपये तर १६ जीबी रॅम आणि ५१२ इंटर्नल जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४५,००० रुपये इतकी असणे आवश्यक आहे. तसेच यात फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि अलर्ट स्लाईडर आणि आयआर ब्लास्टर असे सिक्युरिटी फीचर्स येतात. हा स्मार्टफोन ७ फेब्रुवारी रोजी लाँच होण्याची अपेक्षा आहे.