भारतीय बाजारात सध्या विविध कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. सर्वसामान्य ग्राहकांचा उत्तम कॅमेरा, चांगली बॅटरी लाइफ व जास्तीत जास्त रॅम असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याकडे कल असतो. वनप्लस कंपनीने ग्राहकांच्या याच गरजा लक्षात घेऊन दोन नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. वनप्लस स्मार्टफोनच्या वापरकर्त्यांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच वनप्लसने चीनमध्ये OnePlus12 ही सीरिज लॉन्च केली होती. तेव्हापासून ही सीरिज भारतात केव्हा लॉन्च होणार? याबद्दल वनप्लस प्रेमींच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर वनप्लस कंपनीने मंगळवारी (२४ जानेवारी ) दिल्ली येथील ग्लोबल इव्हेंटमध्ये त्यांचे आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे OnePlus 12 आणि OnePlus 12R हे दोन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च केले.
OnePlus 12 आणि OnePlus 12R स्मार्टफोनविषयी…
वनप्लसचा कोणताही फोन बाजारात लॉन्च झाला की, स्मार्टफोनप्रेमींना त्याची किंमत किती असेल? याबद्दल उत्सुकता असते. ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या OnePlus12Rच्या बेस मॉडेलची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. तर, १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत ४५ हजार ९९९ रुपये आहे.
दुसरीकडे, OnePlus 12 स्मार्टफोनविषयी सांगायचं झालं, तर या व्हेरिएंटमध्ये बेस मॉडेलची किंमत ६४ हजार ९९९ एवढी आहे. तर, १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत ६९ हजार ९९९ रुपये आहे. या दोन्ही स्मार्टफोनच्या प्री बुकिंगला सुरुवात झालेली आहे.
OnePlus12R या स्मार्टफोनची विक्री भारतात ६ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. तर, OnePlus12 ची विक्री भारतात ३० जानेवारीपासून सुरू होईल. OnePlus12 बरोबर कंपनीने गूगल वनच्या १००जीबी क्लाऊड स्पेसची ऑफर दिली आहे. ही ऑफर ६ महिन्यांपर्यंत मर्यादित राहणार आहे. याशिवाय ग्राहकांना ३ महिने मोफत युट्यूब प्रिमियम देखील वापरता येणार आहे.
OnePlus 12 ची वैशिष्ट्ये
- 6.82 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले, यामध्ये ग्राहकांना 2K रिजोल्युशन स्क्रिन मिळेल.
- फोनचा डिस्प्ले 4,500 Nits ब्राइटनेससह उपलब्ध आहे.
- या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Qualcomm Snapdragon 8 Gen 3 ची चिपसेट दिली आहे. यामुळे ग्राहकांना फोनचा वापर अधिक सहजतेने करता येईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
- यामध्ये ग्राहकांना Hasselblad-tuned कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे. (50MP प्रायमरी कॅमेरा, 48MP वाइड कॅमेरा, 64MP टेलिफोटो कॅमेरा व 32MP सेल्फी फ्रंट कॅमेरा)
- स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता 5,400mAh एवढी आहे. ही बॅटरी 100W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
- कंपनीने यासाठी खास वायरलेस चार्जर देखील उपलब्ध करून दिला आहे. यामुळे अवघ्या २६ मिनिटांत तुमचा फोन १ पासून १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो.
- Flowy Emerald आणि सिल्की काळ्या या दोन रंगांमध्ये हा फोन बाजारात उपलब्ध होईल.
OnePlus 12R ची वैशिष्ट्ये
- 6.78 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले, यामध्ये ग्राहकांना 1.5K रिजोल्युशन स्क्रिन मिळेल.
- फोनचा डिस्प्ले 4,500 Nits ब्राइटनेससह उपलब्ध आहे.
- या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Qualcomm Snapdragon 8 Gen 2 ची चिपसेट दिली आहे.
- OnePlus 12R मध्ये ग्राहकांना ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. (50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP मायक्रो लेन्स व 16 MP सेल्फी फ्रंट कॅमेरा )
OnePlus Buds 3 इअरबड्स
वनप्लस कंपनीने त्यांच्या दोन स्मार्टफोनबरोबर OnePlus Buds 3 इअरबड्स देखील लॉन्च केले आहेत.
या इअरबड्समध्ये ग्राहकांना टच कंट्रोल्स देण्यात आले आहेत. यामुळे गाणी ऐकताना अगदी सहज आवाज कमी-जास्त करता येणार आहे. याशिवाय तब्बल ६.५ तासांच्या बॅटरी बॅकअपसह हे इअरबड्स ६ फेब्रुवारीपासून बाजारात उपलब्ध करण्यात येतील.