वनप्लस ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सतत ननवीन स्मार्टफोन्स भारतासह जागतिक बाजारामध्ये लॉन्च कर असते. नुकताच कंपनीने आपला पहिले फोल्डेबल स्मार्टफोन वनप्ल ओपन लॉन्च केला आहे. मुंबईत झालेल्या लॉन्च इव्हेंटमध्ये हा फोन सादर करण्यात आला आहे. आता कंपनी लवकरच आपला वनप्लस १२ हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने चीनमध्ये आयोजित केलेल्या कॉन्फरन्समध्ये आपल्या आगामी फ्लॅगशिप फोनची घोषणा केली आहे. यामध्ये कंपनीने काही निवडक फीचर्सची घोषणा केली आहे. यामध्ये कंपनीने फोनच्या OLED स्क्रीन टेक्नॉलॉजीची माहिती दिली आहे. वनप्लस १२ या फोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कंपनीने आपल्या इव्हेंट दरम्यान वनप्लस १२ मॉडेल सादर केले. तसेच कंपनीने या फोनचा नवीन आऊटपुट डिस्प्ले देखील दाखवला. मात्र हा फोन केस मध्ये सादर करून कंपनीने या फोनच्या मागील कॅमेऱ्याचे मोड्यूल सादर केले नाही. वनप्लसने वनप्लस १२ या फोनचे डिझाइन न दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र या फोनवर उजव्या बाजूला अलर्ट स्लायडर दिसून आले आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
हेही वाचा : घाई करा! केवळ ४,८४९ रूपयांमध्ये ‘हा’ आयफोन खरेदी करण्याची संधी; ऑफर एकदा बघाच
वनप्लस १२ या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये Oriental स्क्रीन फिचर देण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. तसेच यामध्ये ओप्पो कंपनीच्या पहिल्या पिढीतील डिस्प्ले P1 चिपसेटचा सपोर्ट मिळणार आहे. फोटो क्वालिटी, हाय ब्राइटनेसचा फायदा वापरकर्त्यांना होणार आहे. या डिव्हाइसमध्ये डिस्प्लेमेट A+ सर्टिफिकेशन आणि २ के रिझोल्युशन असलेला डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
या फोनमध्ये पीक ब्राइटनेस हा २६०० नीट्स इतका आहे. जो नुकत्याच लॉन्च झालेल्या वनप्लस ओपनपेक्षा कमी आहे. वनप्लस ओपनमध्ये डिस्प्लेचा ब्राइटनेस हा २८०० नीटस इतका आहे. आगामी काळात लॉन्च होणाऱ्या वनप्लस १२ ची स्क्रीन डोळ्यांना सर्वाधिक सुरक्षित अनुभव प्रदान करेल असे कंपनीचे म्हणणे आहे.