OnePlus 13 Series launch in India : वनप्लस पुढील महिन्यात त्यांचा नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस १३ (OnePlus 13) भारतात लाँच करणार आहे. कंपनीने ७ जानेवारी २०२४ रोजी ‘विंटर लाँच इव्हेंट’ हा इव्हेंट शेड्युल केला आहे. हा इव्हेंट IST रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल, जो भारतात ९ वाजता पाहता येईल. याच इव्हेंटमध्ये कंपनीच्या इतर उत्पादनांसह वनप्लस १३ (OnePlus 13) सीरिजचेसुद्धा अनावरण केले जाईल. त्याचबरोबर वन प्लसकडून त्यांचे फ्लॅगशिप इयरबड्स वनप्लस बड्स प्रो ३ (OnePlus Buds Pro 3)देखील सादर केले जाण्याची अपेक्षा वर्तवली आहे.
वनप्लस १३ सीरिज ‘वनप्लस १३’ व ‘वनप्लस १३ आर’ ही दोन मॉडेल्स ऑफरद्वारे सादर करण्यात येतील. वनप्लस १३ (OnePlus 13) या वर्षाच्या सुरुवातीला चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यामुळे भारतात लाँच होताना त्याची तपशिलासह वैशिष्ट्ये सारखीच असणार आहेत. वनप्लस १३ चा फ्रंट कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा LYT-808 प्रायमरी सेन्सर, टेलीफोटो व अल्ट्रावाइड लेन्ससह अद्ययावत करण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्स आता ५० मेगापिक्सेल सेन्सर वैशिष्ट्यासह येणार आहेत. हॅसलब्लॅड-ब्रॅण्डेड कॅमेरा सिस्टीम 4K/60fps डॉल्बी व्हिजन व्हिडीओ रेकॉर्डिंगलादेखील सपोर्ट करतो आणि सुधारित गुणवत्तेचा व्हिडीओ ग्राहकांना देतो.
अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर
वनप्लस १३ (OnePlus 13) मध्ये आयपी ६८ (IP68) आणि आयपी ६९ (IP69) रेटिंगचाही समावेश आहे, त्यामुळे या फोनचे पाणी (high-pressure water jets) व धूळ यांपासून संरक्षण होईल. त्याचबरोबर अनलॉकिंगसाठी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे; ज्यामुळे ओल्या हातांनीही तुम्ही तुमचा फोन अनलॉक करू शकणार आहात. गेमिंगचा अनुभव वाढविण्यासाठी ॲडव्हान्स व्हायब्रेशन मोटरचा (advanced vibration motor) समावेश असणार आहे.असे देखील कन्फर्म करण्यात आला आहे की, मोबाइलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टेक्नॉलॉजीची सुविधा दिली जाईल.
वनप्लस १३ ला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट (Qualcomm Snapdragon 8 Elite chipset) देण्यात आला आहे आणि वनप्लस १३ आर स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरवर हा स्मार्टफोन चालणार आहे. OnePlus 13R मध्ये 1.5K रिझोल्युशन डिस्प्ले, स्लिम डिझाइन असेल; ज्यात एक शानदार कॅमेरा लेआउट देण्यात येणार आहे. तर, दोन्ही हॅण्डसेट स्मूथ व्हिज्युअलसाठी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतील. त्याचबरोबर हे दोन्ही फोन Android 15-आधारित OxygenOS 15 सह ग्राहकांना मिळतील. ही अद्ययावतता वनप्लसच्या अनेक जनरेशनला दिली जाईल, असेसुद्धा सांगण्यात आले आहे.