OnePlus Smartphone: वनप्लस स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मोबाईल निर्माता वनप्लस लवकरच भारतात एक आणखी एक नवीन डिव्हाइस सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘OnePlus Ace 2’ नावाचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. याआधी कंपनीने २१ नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात एक स्वस्त स्मार्टफोन ‘OnePlus Nord N20 SE’ लाँच केला होता. हा स्मार्टफोन भारतात सेलसाठी उपलब्ध झाला आहे. आता इंटरनेटवर OnePlus Ace 2 चे स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले आहेत. जाणून घेऊया या नव्या स्मार्टफोनमध्ये काय खास असेल.

OnePlus Ace 2 स्मार्टफोनमध्ये काय असेल खास?

OnePlus Ace 2 हा स्मार्टफोन लाँच होण्याआधीच लीक झाला असून या स्मार्टफोनची माहिती टिपस्टर योगेश बरारनं शेयर केली आहे. शेयर केलेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन ६.७ इंचाच्या १.५के डिस्प्लेवर लाँच होईल, अशी माहिती आहे. यात स्क्रीन पंच-होल स्टाईलसह मिळेल जी फ्लूड अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल. तसेच १२०हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. सेल्फी कॅमेरा फोनच्या वरच्या बाजूला मध्यभागी असलेल्या पंच-होलमध्ये मिळेल.

rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल
yek number OTT release update
तेजस्विनी पंडित निर्मित ‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
Skoda Kylaq SUV launched In India
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
ranbir kapoor ramayana poster out
ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट, निर्मात्यांनी जाहीर केला मोठा ट्विस्ट

(आणखी वाचा: Vu चा धमाका: दमदार साउंड आणि स्टायलिश डिजाइनसह लाँच झाला VUचा ‘हा’ Smart TV; तुमच्या घरालाच बनवेल थिएटर, पाहा किंमत )

तीन पर्यायांमध्ये होणार सादर

या डिवाइसमध्ये १६ जीबी पर्यंत रॅम आणि नवीन मजबूत फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये ५०००mAh बॅटरी असेल. जी १००W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन ८ जीबी, १६जीबी आणि १२ जीबी रॅम अशा तीन पर्यायांमध्ये सादर केला जाऊ शकतो. तर फोनमध्ये २५६जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळेल. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus Ace 2 फोन नवीनतम Android 13 वर चालेल. बॅटरीच्या बाबतीत,

OnePlus Ace 2 कॅमेरे

फोटोग्राफीसाठी OnePlus Ace 2 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनलवर ५०MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सर दिला जाईल, जोडीला ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी OnePlus Ace 2 मध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

OnePlus Ace 2 किंमत

OnePlus Ace 2 फोनच्या किंमतीबद्दल सध्या कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही, परंतु फोनचे मजबूत फीचर्स पाहता असे दिसते की हा स्मार्टफोन मिड-बजेट रेंजमध्ये सादर केला जाऊ शकतो.