देशात ५ जी सेवा सुरू झाली असून सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल काही मोजक्या शहरांमध्ये ५ जी सेवा देत आहेत. मात्र, अनेक फोन्समध्ये ५ जी सॉफ्टवेअर अपडेट इन्स्टॉल नसल्याने ते पूर्ण क्षमतेने ही सेवा देऊ शकत नव्हते. आता मोबाईल कंपन्यांनी आपल्या ५ जी फोन्ससाठी सॉफ्टवेअर अपडेट देणे सुरू केले आहे. अ‍ॅपल डिसेंबर महिन्यात अपडेट देणार आहे. वनप्लसने आपल्या युजर्सना ५ जीसाठी सॉफ्टवेअर अपडेट देणे सुरू केले आहे. वनप्लस १० आर, १० टी, १० प्रोसाठी अपडेट आधीच देण्यात आला असून, आता nord 5g आणि nord ce 5g साठी अपडेट देण्यास सुरुवात झाली आहे.

या सॉफ्टवेअर अपडेटमुळे वनप्लसचे फोन जिओच्या ५ जी सेवेला सपोर्ट करू शकतील. कम्युनिटी फॉरमच्या माध्यमातून कंपनीने अपडेट जारी केल्याची पुष्टी केली आहे. वनप्लस नॉर्डच्या दोन्ही फोन्स एअरटेल ५ जीला सपोर्ट करतात. आता नव्या सॉफ्टवेअरमुळे ते जिओच्या ५ जी नेटवर्कला सपोर्ट करू शकतील. सॉफ्टरवेर अपडेटमुळे ५ जी प्रणालीमध्ये स्थिरता आणि तरलता मिळेल. अपडेटमध्ये ऑक्टोबर महिन्याचे सुरक्षा पॅच देखील मिळते.

Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?

(अमेझॉनने लाँच केला स्वस्त वार्षिक प्लान; ५९९ रुपयांमध्ये काय मिळतंय? जाणून घ्या)

जारी करण्यात आलेले सॉफ्टवेअर अपडेट वाढीव अपडेट असून ते हळूहळू वापरकर्त्यांपर्यंत पोहोचेल. अपडेटसाठी सूचना मिळाली नसल्यास तुम्ही स्वत: अपडेट आले की नाही हे तपासू शकता. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन त्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये अपडेट आले की नाही हे तपासता येईल.

वनप्लस नॉर्डने जुलै २०२० मध्ये पदार्पण केले होते. हा कंपनीचा पहिला परवडणारा स्मर्टफोन होता. फोनला जुलै २०२३ पर्यंत सुरक्षा पॅचेस मिळतील. हा फोन ऑक्सिजन ओएस १३ आणि अँड्रॉइड १३ अपडेट प्राप्त करण्यास पात्र नाही. वनप्लस नॉर्डला हे अपडेट मिळू शकतात.