वनप्लसचा कीबोर्ड लवकरच लाँच होणार आहे. १५ डिसेंबरला या कीबोर्डबद्दल अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार होती. पण अजुनही या अधिकृत लाँचला अवकाश आहे. कीबोर्डचा एक लूक युजर्ससाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आकर्षक लूकने याचे फीचर्स जाणून घेण्याची युजर्सची उत्सुकता वाढली आहे. या कीबोर्डमध्ये काय खास आहे जाणून घ्या.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कीबोर्ड बनवणाऱ्या ‘कीक्रोन’ या कंपनीच्या सहकार्याने वनप्लसचा हा कीबोर्ड बनवण्यात आला आहे. ‘वनप्लस फीचरिंग’ हा नवा प्लॅटफॉर्म वनप्लसद्वारे डिसेंबरमध्ये लाँच करण्यात आला. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळे प्रॉडक्ट लॉन्च केले जाणार आहेत. आता याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंपनीचा पहिला कीबोर्ड लाँच करण्यात येणार आहे. याची माहिती एका ट्विटर पोस्टद्वारे देण्यात आली.
आणखी वाचा: WhatsApp वर आता मेसेजसाठीही होणार View Once सुविधा उपलब्ध; लगेच जाणून घ्या
वनप्लसचे ट्वीट:
आणखी वाचा: कॅण्डिड स्टोरी, नोटपॅड इन्स्टाग्रामवर आलेले भन्नाट फीचर्स पाहिले का? कसे वापरायचे लगेच जाणून घ्या
या कीबोर्डमध्ये ॲल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे हे वजनास हलके असेल. हा कीबोर्ड मॅक, विंडोज आणि लिनक्ससाठी वापरता येऊ शकेल. याचे लेआउट मॅकबुक कीबोर्ड सारखे असेल, परंतु हे एमएस विंडोजसाठी देखील वापरता येईल.