OnePlus ही एक लोकप्रिय मोबाइल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन गॅजेट्स लॉन्च करत असते. वनप्लस आज त्याच्या Nord सिरीजअंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन आणि वायरलेस इअरबड्स भारतात लॉन्च करणार आहे. नवीन नॉर्ड डिव्हाइसचे लॉन्चिंग समर लॉन्च इव्हेंटमध्ये संध्याकाळी ७ वाजता केले जाणार आहे. OnePlus Nord 3 5G, OnePlus Nord CE 3 5G, OnePlus Nord Buds 2r आणि OnePlus BWZ2 ANC यासह किमान चार नवीन प्रॉडक्ट आज लॉन्च होणार आहेत. दोन्ही नवीन फोन हे अधिक प्रमाणामध्ये एकसमान दिसत आहेत. मात्र गुणवत्तेनुसार किंमतीमध्ये फरक असू शकतो.
नॉर्ड ३ मध्ये ६.७४ इंचाचा फुल एचडी + AMOLED डिस्प्ले आणि त्याला १२० Hz इतका रिफ्रेश रेट मिळू शकतो. तसेच रिअर कॅमेरा सेटअपमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी या फोनबद्दल ज्या अफवा किंवा माहिती समोर येत आहे त्यानुसार या फोनच्या फीचर्सबद्दल अँड्रॉइड १३ , Dimensity 9000 SoC आणि अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरचा समावेश आहे. हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकतो. ८/१२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३२,९९९ रुपये आणि १६/२५६ जीबी स्टोरेजसाठी ३६,९९९ रुपये असण्याची शक्यता आहे.
वनप्लस नॉर्ड CE 3 5G नॉर्ड ३ च हलके व्हर्जन असेल. अधिकृत पोस्टरमध्ये असे दिऊन येत आहे की, फोनमध्ये अलर्ट स्लाईडरची कमतरता जाणवू शकते. या फोनमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि त्याला ८० W चे वायर्ड SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसर असू शकतो.
Buds 2r बद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये ब्लॅक आणि ब्ल्यू हे दोन रंग असायची शक्यता आहे. मूळ नॉर्ड बड्स केसच्या तुलनेत आताच्या बड्सची केस ही गोलाकार असू शकते. हे App सपोर्ट, टच कंट्रोल असे फिचर असतील. सात तास आपण याद्वारे गाणी ऐकू शकतो. या इअरबड्सची किंमत ३ हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. वनप्लस आपली नवीन प्रॉडक्ट्स ५ जुलै २०२३ रोजी लॉन्च करणार आहेत.
लॉन्चिंग इव्हेंट कुठे पाहता येईल ?
वनप्लस कंपनी आज दोन स्मार्टफोन आणि वायरलेस इअरबड्सचे लॉन्चिंग करणार आहे. हा लॉन्चिंग इव्हेंट चाहते संध्याकाळी ७ वाजता YouTube आणि वनप्लस इंडियाच्या अधिकृत चॅनलवर पाहू शकतात. कंपनी आपल्या सोशल मीडिया चॅनल्सवर लाईव्ह अपडेट्स देखील शेअर करणार आहे. नवीन अपडेट्स आणि नॉर्ड ३ च्या रिव्ह्यूसाठी वाचक इंडिया टुडे टेक वेबसाईटवरदेखील जाऊ शकतात.