OnePlus कंपनीने नुकताच आपला OnePlus Nord CE 3 Lite 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन आजपासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेले ग्राहक भरघोस डिस्काउंटमध्ये हा फोन खरेदी करू शकणार आहेत. Nord CE 3 Lite 5G या स्मार्टफोनवर सुरु असलेली ऑफर्स आणि त्याची किंमत याबद्दल जाणून घेऊयात.
OnePlus Nord CE 3 Lite 5G ची किंमत
OnePlus Nord CE 3 Lite 5G या फोनमधील ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये इतकी आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंस्ट्रल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन तुम्ही Chromatic Gray आणि Pastel Lime या रंगांमध्ये खरेदी करू शकता. ग्राहक आज दुपारी १२ वाजल्यापासून ई-कॉमर्स साईट Amazon , वन प्लसची अधिकृत वेबसाईट आणि वन प्लस एक्सपीरिअन्स स्टोअर आणि अन्य रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकता.
हेही वाचा : Twitter वर एलॉन मस्क यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो, युजर्स म्हणाले…
ग्राहकांना हा फोन खरेदी करत असताना भरघोस डिस्काउंट मिळणार आहे. ICICI बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या EMI व्यवहारावर १,००० रुपयांचा तात्काळ डिस्काउंट तुम्ही मिळवू शकता. याशिवाय जे ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा Amazon वरून हा फोन खरेही करतील त्यांना OnePlus Nord Buds CE मोफत मिळणार आहेत. OnePlus १२ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान OnePlus अधिकृत साइट आणि OnePlus Store App द्वारे केलेल्या खरेदीसाठी OnePlus Nord Watch वर १,००० रुपयांची सूट देत आहे.
OnePlus Nord CE 3 Lite 5G चे फीचर्स
OnePlus Nord CE 3 Lite या फोनमध्ये वापरकर्त्यांना यामध्ये एलसीडी डिस्प्ले वापरायला मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १८०० २४०० पिक्सेल इतका असणार आहे. OnePlus Nord CE 3 Lite ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर मिळणार आहे.
वापरकर्त्यांना यामध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि त्याला ६७W चे SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. या फोनचे एकूण वजन हे १९५ ग्रॅम इतके असणार आहे. नेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, ब्लूटूथ 5.1, Wi-Fi, GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट असे फिचर मिळणार आहेत.