वनप्लसच्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये क्रेज आहे. दमदार स्पेसिफीकेशन्ससह हा बाजारात उपलब्ध आहे. वनप्लसच्या याच सिरीजमध्ये आता पुन्हा ‘वनप्लस नॉर्ड एन 300 5जी’ हा स्मार्टफोन लाँच झाला आहे. तर वनप्लसचा कॅमेरा, बॅटरीबॅकप, रॅम, ग्राफिक्स, कींमत इत्यादी स्पेसीफीकेशन्स बद्दल सविस्तर जाणून घ्या.

‘वनप्लस’ मध्ये काय मिळणार खास ?

Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
alia bhatt diwali yellow saree is plant dyed and recycled from florals
झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क

वनप्लस नॉर्ड एन 300 5जी फोन सर्वात नवीन आणि अ‍ॅडव्हान्स अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे. जो ऑक्सीजन ओएस १३ सह मिळून काम करतो. हा वनप्लस मोबाईल अमेरिकन बाजारात सादर करण्यात आला आहे जो, मिडबजेट 5जी फोन आहे. ज्यात ४८ मेगा पिक्सल कॅमेरा, ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज. त्याचबरोबर 33W ५०००mAh बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन १६१२ × ७२० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.६५ इंचाचा एचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन पार्ट आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. ग्राफिक्ससाठी हा वनप्लस मोबाईल माली-जी ५७ एमसी२ जीपीयूला सपोर्ट करतो.

आणखी वाचा : धक्कादायक! VI ने केले ‘हे’ लोकप्रिय प्लॅन बंद; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या…

‘वनप्लस नॉर्ड एन 300 5जी’ फोटोग्राफीसाठी उत्तमच!

प्रत्येक व्यक्ती फोन घेताना फोटोग्राफीसाठी उत्तम कॅमेऱ्याचा विचार करतो. तर यामध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड एन 300 5जी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह मिळून चालतो. युजर्सच्या सुरक्षेसाठी या मोबाईल फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

‘वनप्लस नॉर्ड एन 300 5जी’ किंमत किती?

आतापर्यंतच्या वनप्लसच्या सिरीज मधला ‘वनप्लस नॉर्ड एन 300 5जी’ हा सर्वात स्वस्त फोन आहे. हा सध्या सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. अमेरीकी बाजारात या फोन ची किंमत $२२८ डॉलर आहे. भारतीय करंसीनुसार १८ हजार ८०० इतकी असू शकते.