Red Rush Days sale Start : वनप्लस या जागतिक तंत्रज्ञान ब्रँडने भारतीय ग्राहकांसाठी एक नवीन सेल जाहीर केला. ११ फेब्रुवारी म्हणजे कालपासून वनप्लस ‘रेड रश डेज’ (Red Rush Days sale ) सेल सुरू आला आहे, जो १६ फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. या सेलदरम्यान भारतीय ग्राहक अनन्य सवलती, आकर्षक बँक ऑफर, कम्युनिटी फ्लॅगेटिव्ह स्मार्टफोन प्लॅन्स, कंपनीच्याच्या पसंतीच्या स्मार्टफोन उत्पादनांचा आनंद घेऊ शकतात.
OnePlus.in, OnePlus Store App, OnePlus Experience Stores, Amazon.in आणि रिलायन्स डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स, बजाज इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर अनेक साईडवर तुम्ही‘रेड रश डेज’ सेलचा ऑनलाइन लाभ घेऊ शकता.
वनप्लस फ्लॅगशिप सीरिज (OnePlus Flagship Series)
वनप्लस १३ सीरिज (OnePlus 13 Series)
या वर्षाच्या सुरुवातीला, OnePlus ने OnePlus 13 सीरिज सादर केली. वनप्लस १३, वनप्लस १३ आर आणि वनप्लस १३ हे फ्लॅगशिप AI क्षमतेसह एक फ्लॅगशिप पॉवरहाऊस आहे, जे Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर, 6,000 mAh सिलिकॉन नॅनोस्टॅक बॅटरी, ड्युअल एक्सपोजर अल्गोरिदम, क्लियर बर्स्ट, ॲक्शन मोड यांसारख्या फीचर्ससह 50MP ट्रिपल-कॅमेरा, जलद गतीने चालणाऱ्या विषयांचे आश्चर्यकारक शॉट्स, ऑक्सिजन ओएस १५ तर दुसरीकडे वनप्लस १३ आर, अधिक सुलभ किमतीत फ्लॅगशिप लेव्हल पफॉर्मन्स आणि AI तंत्रज्ञान ऑफर करतो, तर ‘रेड रश डेज’ (Red Rush Days sale ) सेलदरम्यान ग्राहक निवडक बँक कार्डांवर वनप्लस १३ वर ५ हजार आणि वनप्लस १३ आर वर ३ हजार रुपयांची बँक सवलत मिळू शकते. तसेच ग्राहक बजाज फिनसर्व्ह आणि इतर क्रेडिट कार्डांवर २४ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय, ७ हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनसचा लाभसुद्धा घेऊ शकतात.
वनप्लस १२ सीरिज (OnePlus 12 series)
सगळ्यात बेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनपैकी एक वनप्लस १२ मध्ये स्नॅपड्रॅगन® 8 Gen 3 चिप, ट्रिनिटी इंजिन, 2K 120Hz ProXDR डिस्प्ले, 100W SUPERVOOC, 50W Wire AIRVOC वायरलेस चार्जिंग, मोबाइलसाठी चौथा जनरल हॅसलब्लाड कॅमेरा देण्यात आला आहे, तर ‘रेड रश डेज’ (Red Rush Days sale ) सेलदरम्यान ग्राहक निवडक बँक कार्ड्सवर चार हजार पर्यंतची सूट आणि तीन हजार रुपयांपर्यंत इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळू शकणार आहे. बजाज फिनसर्व्ह आणि इतर आघाडीच्या क्रेडिट कार्डांवर १२ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयचादेखील लाभ घेऊ शकतात.
वनप्लस नॉर्ड स्मार्टफोन
वनप्लस नॉर्ड ४ (OnePlus Nord 4)
वनप्लस नॉर्ड ४ हा एकमेव मेटल युनिबॉडी स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर आणि 256 GB पर्यंत स्टोरेज, फ्लॅगशिप लेव्हल हार्डवेअरदेखील आहे. यात ५० मेगापिक्सेलचा सोनी में कॅमेरा सेन्सर आणि 5500mAh बॅटरी आहे, जी वनप्लस नॉर्ड डिव्हाइसमध्ये वापरली जाणारी सर्वात मोठी बॅटरी आहे. ही बॅटरी 100W SUPERVOOC तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, म्हणजे ती फक्त २८ मिनिटांत १ ते १०० पर्यंत चार्ज केली जाऊ शकते. तर ‘रेड रश डेज’ सेलदरम्यान ग्राहक वनप्लस नॉर्ड वर ४ हजार पर्यंतच्या विशेष सवलतीचा आनंद घेऊ शकतात. निवडक बँक कार्ड व्यवहारांवर चार हजारपर्यंत त्वरित बँक सवलत, तर बजाज फिनसर्व्ह आणि इतर आघाडीच्या क्रेडिट कार्डांवर ९ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयदेखील घेऊ शकतात.
वनप्लस नॉर्ड ४ सीई ४ आणि सीई ४ लाईट (OnePlus Nord CE4 and CE4 Lite)
वनप्लस नॉर्ड ४ सीई ४ पॉवर-पॅक कामगिरी आणि जबरदस्त डिझाइनसह बनवण्यात आला आहे. हे सर्व ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 चिपसेट आणि 8GB रॅमसह येतात. स्मार्टफोनला एक पॉवरफुल 5500mAh बॅटरी आहे, जी 100W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.
वनप्लस नॉर्ड ४ सीई ४ लाईट दिवसभर मनोरंजन देण्याचा अनुभव प्रदान करते. या स्मार्टफोनमध्ये एक विशिष्ट डिझाइन आहे. Nord चे हॉलमार्क आकर्षक, मजबूत आणि ठळक डिझाइन राखून, स्मार्टफोन दोन रंगांमध्ये सुपर सिल्व्हर आणि मेगा ब्लू या दोन रांगांमध्ये उपलब्ध आहे.
तर ‘रेड रश डेज’ (Red Rush Days sale) सेलदरम्यान ग्राहक वनप्लस नॉर्ड ४ सीई ४ वर १०० रुपयांपर्यंतच्या विशेष सवलतीसह बजाज फिनसर्व्ह आणि इतर आघाडीच्या क्रेडिट कार्डवर नऊ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयचा आनंद घेऊ शकतात आणि वनप्लस नॉर्ड ४ सीई ४ लाईटच्या खरेदीवर ग्राहक आघाडीच्या क्रेडिट कार्डांवर तीन महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयचादेखील पर्याय घेऊ शकतात. याव्यतिरिक्त, OnePlus Nord CE4 आणि OnePlus Nord CE4 Lite वर ग्राहक निवडक बँकांवर २००० रुपयांपर्यंत त्वरित बँक सवलत मिळवू शकतात.
वनप्लस वॉच २ (OnePlus Watch 2)
वनप्लस वॉच २ हे एक आकर्षक फ्लॅगशिप स्मार्टवॉच आहे, ज्यामध्ये Wear OS by Google™ (Wear OS 4) ची नवीन व्हर्जन समाविष्ट आहे. फ्लॅगशिप ड्युअल चिपसेट आणि वेअर ओएसच्या हायब्रिड इंटरफेससह अद्वितीय ड्युअल-इंजिन आर्किटेक्चर, संपूर्ण स्मार्ट मोडमध्ये १०० तासांपर्यंतची बॅटरी लाइफ आणि प्रीमियम बिल्ड आणि डिझाइनसह उपल्बध आहे, तर ‘रेड रश डेज’ सेलदरम्यान ग्राहक वनप्लस वॉच २ वर दोन हजार रुपयांपर्यंतची विशेष सूट, हजार रुपयांपर्यंतची बँक सूट आणि १२ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयच्या पर्यायाचा आनंद घेऊ शकतात.
वनप्लस वॉच २ आर (OnePlus Watch 2R)
वनप्लस वॉच २ आर फिटनेस करणाऱ्या लोकांसाठी डिझाइन केले आहे. १०० तासांची बॅटरी लाईफ, Wear OS by Google™ (Wear OS 4) सह समर्थित, हलक्या वजनाच्या ॲल्युमिनियमपासून तयार केलेले, वॉच 2R फॉरेस्ट ग्रीन आणि गनमेटल ग्रे प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ‘रेड रश डेज’ सेलदरम्यान ग्राहक तीन हजार रुपयांची विशेष सवलत १००० रुपयांची तात्काळ बँक सवलत, सहा महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय पर्यायासहदेखील खरेदी करू शकतात.
वनप्लस पॅड २ आणि वनप्लस पॅड गो (OnePlus Pad 2 & OnePlus Pad Go)
वनप्लस पॅड २, सेकंड जनरेशन फ्लॅगशिप Qualcomm Snapdragon™ 8 Gen 3 प्लॅटफॉर्मद्वारे पॉवर्ड आहे. जबरदस्त 3K डिस्प्ले, सहा स्टिरीओ स्पीकर, इम्प्रेसिव्हज बॅटरी आहे. कंपनी OnePlus Pad Go देखील ऑफर करते, जी एका कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरमध्ये अव्वल दर्जाचा अनुभव देते. प्रभावशाली 2.4K रिझोल्यूशनसह, पॅड गो एखाद्याच्या बजेटवर ताण न आणता तुमच्या गरजेच्या गोष्टी प्रदान करते.
त्याचबरोबर या सेलदरम्यान ग्राहकांना वनप्लस पॅड २ वर दोन हजार आणि वनप्लस पॅड गो वर तीन हजार रुपयांची विशेष सवलत, तसेच तीन हजार आणि दोन हजार रुपयांची झटपट बँक सूट मिळू शकते. तर वनप्लस पॅड २ ला पाच हजार रुपयांचा अतिरिक्त एक्स्चेंज बोनसदेखील मिळू शकतो.
वनप्लस बाँड्स प्रो ३ (OnePlus Buds Pro 3)
नुकतेच अपग्रेड केलेले वनप्लस बाँड्स प्रो ३ स्टेडी कनेक्ट इंटिग्रेट्स करते, जे विमानतळ, रेल्वेस्थानक यांसारख्या आव्हानात्मक, हाय-इंटरफेरेन्स वातावरणातही ब्लूटूथ ऑडिओ स्ट्रेंन्थ, रेंज सुधारते. OnePlus Buds Pro 3 हे OnePlus 13 सीरिजबरोबर जोडलेले असताना AI क्षमता वाढवते, दैनंदिन समोरासमोरील संभाषणासाठी अखंड कनेक्टिव्हिटी आणि सुविधा देते. द्विभाषिक संवादामध्ये, युजर्स त्यांच्या OnePlus Buds Pro 3 द्वारे त्यांची पसंतीची भाषा ऐकू शकतात. त्याचबरोबर Red Rush Days sale या सेलदरम्यान ग्राहक अनुक्रमे हजार रुपयांच्या अतिरिक्त तात्काळ बँक सवलतीसह विशेष सवलतीचा आनंद घेऊ शकतात. तसेच निवडक बँक कार्डांवर १२ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्यायदेखील उपलब्ध आहे.