वनप्लस ही देशातील एक लोकप्रिय मोबाइल कंपनी आहे. कंपनी बाजारामध्ये आपले अनेक नवनवीन गॅजेट्स लॉन्च करत असते. ज्यात स्मार्टफोन्स, टॅबलेट, एअरपॉड्स अशा अन्य गोष्टींचा समावेश असतो. वनप्लस कंपनीने नुकतेच आपल्या वनप्लस पॅडच्या अधिक परवडणाऱ्या व्हर्जनचा पहिला लूक सादर केला. वनप्लसने आपल्या नवीन वनप्लस गो टॅब्लेटचा लूक सादर केला आहे. गो टॅबलेट हा ६ ऑक्टोबर २०२३ ला भारतात लॉन्च होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच वनप्लस पॅड गो लॉन्च शेड्युलनुसार, नवीन टॅबलेटचे फीचर्स १९ सप्टेंबर म्हणजेच उद्या जाहीर केले जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनप्लस कंपनीने आपल्या क्लाउड ११ लॉन्चिंग इव्हेंटमध्ये भारतात आपला टॅबलेट लॉन्च केला होता. ज्यावेळी वनप्लस ११ देखील लॉन्च करण्यात आला होता. नवीन टॅबलेटची किंमत OnePlus पॅडच्या तुलनेत अधिक स्पर्धात्मक असेल. वनप्लस पॅड गो टॅबलेट हा वनप्लस पॅडच्या तुलनेत अधिक मनोरंजन अनुभव देणारा टॅबलेट असेल. याबाबतचे वृत्त business today ने दिले आहे.

हेही वाचा : २०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या Honor च्या स्मार्टफोनचा सेल ‘या’ प्लॅटफॉर्मवर आजपासून सुरु; ऑफर्स एकदा पाहाच

या नवीन टॅब्लेटच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास हे डिव्हाइस प्रीमियम सारखेच दिसते. ”आम्ही संपूर्ण पॅड सिरीजमध्ये एक एकिर्त व्हिज्युअल ओळख देण्यासाठी डिझाइनमधील काही गोष्टी राखून ठेवला आहेत.” असे वनप्लसने एका निवेदनात म्हटले आहे. वनप्लस पॅड गो चे मागील बाजूचे डिझाइन हिरव्या रंगाच्या दोन वेगेवगेळ्या प्रकारे दिसते. टॅबलेटमध्ये ब्राइट मॅट आणि ग्लॉसी फिनिश मिळणार आहे.

वनप्लस पॅड गो : डिटेल्स

वनप्लस पॅड हा कंपनीच्या सेगमेंटमध्ये असणारा एकमात्र टॅबलेट आहे. टॅबलेटमध्ये मीडियाटेक डायमेन्शन ९००० चिपसेटचा सपोर्ट मिळतो. नवीन व्हर्जन हे वेगळ्या चिपसेटच्या सपोर्टसह लॉन्च होऊ शकते. वनप्लसने फ्लॅगशिप टॅबलेटवर १४४ Hz डिस्प्ले पॅनलचा वापर केला आहे. पॅड गो मध्ये कमी स्पेसिफिकेशन्स असणारे व्हेरिएंट असू शकते. नवीन पॅड गो मध्ये जुन्या डिव्हाइससारखेच ७.५ इतका अस्पेक्ट रेशो असू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oneplus reveals design of one plus pad go launch 6 october in india check all details tmb 01