OnePlus Y1S Pro 55 inch : वनप्लस मोबाईल क्षेत्रासह टीव्ही क्षेत्रातही नशीब आजमवू पाहात आहे. कंपनी आपल्या स्मार्ट टीव्हीसह सॅमसंग, सोनी कंपनीच्या टीव्हींना टक्कर देत आहे. कंपनीने आता Y1S Pro 4K TV लाँच केला असून त्यात ५५ इंच स्क्रीन मिळत आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये वनप्लस कनेक्ट २.०, ऑक्सिजन प्ले २.०, २३० पेक्षा अधिक लाइव्ह चॅनल्स आणि २४ वॉट साउंड आऊटपूट मिळतो.

किंमत

Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
Kaun Banega Crorepati Season 16 Amitabh Bachchan says I neither keep cash nor visit an ATM
KBC 16 : अमिताभ बच्चन ATM मध्ये कधीच गेले नाहीत, जया बच्चन यांच्याकडून घेतात पैसे, म्हणाले…
chala hawa yeu dya reality show got less trp from last few years
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Zee Marathi Lakshmi Niwas Serial New Entry
Video : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री! साकारणार ‘ही’ भूमिका, जबरदस्त प्रोमो आला समोर
Shiva
Video : “मी आता अंधाराला…”, आशू-शिवामधील गैरसमज दूर करण्यासाठी पाना गँगची युक्ती; पाहा प्रोमो

OnePlus TV 55 Y1S Pro टीव्हीची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. हा टीव्ही डिसेंबर १३ पासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. टीव्ही तुम्ही वनप्लस.इन, फ्लिपकार्ट, वनप्लस एक्सपिरिएन्स स्टोअर्स आणि प्रमुख रिटेल स्टोअर्समधून खरेदी करू शकता. सुरुवातील ऑफर म्हणून कंपनीने आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि क्रेडिट किंवा डेबिट कार्ड इएमआय ट्रान्झॅक्शनवर ३ हजार रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटची घोषणा केली आहे. कंपनी ९ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय देखील देत आहे.

(लाँच झाला ‘SAMSUNG’चा भन्नाट फोन, 8 जीबी रॅम, ५००० एमएएच बॅटरी, तेही ८९९९ मध्ये, कुठे मिळणार? जाणून घ्या)

फीचर्स

OnePlus TV 55 Y1S Pro मध्ये ५५ इंच ४ के यूएचडी एलईडी स्क्रीन, बेझेल लेस डिझाईन, ऑटो लो लॅटेन्सी मोड आणि एमईएमसी सपोर्ट मिळते. टीव्हीमधून २४ वॉटचा ऑडिओ आऊटपूट मिळतो आणि तो डोलबी अटमोसला देखील सपोर्ट करतो. हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉइड टीव्ही १० वर आधारीत ऑक्सिजन २.० वर चालतो आणि त्यात गुगल असिस्टंट बिल्ट इन देखील मिळतो. टीव्ही अमेझॉन अलेक्सावर देखील काम करतो. टीव्हीमध्ये ६४ बीट मीडियाटेक एमटी ९२१६ प्रोसेसर मिळत असून २ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोअरेज कॅपेसिटी मिळते.

टीव्हीमध्ये कंपनीचा गामा इंजिन मिळतो जी चांगली पिक्चर क्वालिटी देण्यासाठी मदत करतो. कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये ३ एचडीएमआय, २ यूएसबी ऑप्टिकल, इथरनेट, वायफाय, ब्लूटूथ हे फीचर्स मिळतात. टीव्हीमध्ये आयकेअर मोड आणि किड्स मोड देखील मिळतात.

Story img Loader