आधार कार्ड हे भारतातील एक आवश्यक कागदपत्र बनले आहे. तसेच आधार कार्ड हा केवळ ओळखीचा पुरावा नाही तर अनेक सरकारी आणि इतर कामाच्या लाभांसाठी अनिवार्य कागदपत्र आहे. तुमचे आधार कार्ड एक अद्वितीय दस्तऐवज आहे. कारण त्यात आवश्यक माहिती असते. मुलांच्या प्रवेशापासून ते सरकारी अर्ज भरेपर्यंत आधारकार्डचा वापर केला जातो.
आधार कार्ड करा सहज अपडेट
अनेकदा असे घडते की तुम्हाला आधारकार्ड मध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख बदलावी लागते किंवा नवीन आधार कार्ड बनवावे लागते. त्यामुळे आता तुम्हाला आधार केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. तुम्ही आता घरी बसून अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि आधार सेवा केंद्रावरील लांबलचक रांगा टाळू शकता. आधार अपडेटसाठी तुम्ही अपॉइंटमेंट कशी घेऊ शकता हे जाणून घ्या.
नवीन आधार नोंदणी
नाव अपडेट
पत्ता अपडेट
मोबाईल नंबर अपडेट
ईमेल आयडी अपडेट
जन्मतारीख अपडेट
लिंग अपडेट
बायोमेट्रिक अपडेट्स
अश्या पद्धतीने शेड्यूल करा ऑनलाइन अपॉइंटमेंट
https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जा.
My Aadhaar वर क्लिक करा आणि book a appointment पर्याय निवडा.
ड्रॉपडाउनमध्ये तुमचे शहर आणि स्थान निवडा.
Proceed to book appointment या पर्यायावर क्लिक करा.
मोबाईल नंबर एंटर करा, ‘नवीन आधार’ किंवा ‘आधार अपडेट’ पर्यायावर क्लिक करा.
Captcha एंटर करा आणि जनरेट OTP वर क्लिक करा.
OTP एंटर करा आणि Verify वर क्लिक करा.
पुराव्यासह वैयक्तिक तपशील आणि पत्ता प्रविष्ट करा.
टाइम स्लॉट निवडा आणि Next वर क्लिक करा.
अश्या पद्धतीने ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रक्रिया पूर्ण होईल.