Online Vs Offline Buying Smartphone which method is better for You : सध्या ॲमेझॉन व फ्लिपकार्ट कंपन्यांचे ऑनलाइन सेल सुरू आहेत. या सेलमध्ये ऑनलाईन, ऑफलाइन स्टोअर्समध्ये विविध स्मार्टफोन्सवर डिस्काउंट ऑफर करत आहेत. दोन्ही ई-कॉमर्स वेबसाइट्सने सणासुदीच्या काळात गेल्या महिन्यात हे सेल सुरू केले होते. पण, आणखी काही दिवस हे सेल सुरू राहण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. सेल म्हटल्यावर आपण सगळ्यात पहिला स्वस्तात मस्त स्मार्टफोन घेण्याचा विचार करतो. पण, ऑफलाइन स्मार्टफोन घेतलेला चांगला की ऑनलाइन (Online vs Offline) असा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडतो. तर तुम्ही या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ऑफलाइन, ऑनलाइन स्मार्टफोन खरेदी करण्याचे फायदे जाणून घेऊयात.
ऑफलाइन की ऑनलाइन (Online vs Offline Buying Smartphone)?
१. अनेक स्मार्टफोन केवळ ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध असतात, त्यामुळे हे फोन सहसा ऑफलाइन उपलब्ध नसतात. पण, असे असले तरीही ऑनलाइन ऑफर केलेल्या स्मार्टफोनची किंमत ऑफलाइनपेक्षा कमी असते. त्याचप्रमाणे ही बाब लक्षात ठेवणेही महत्वाचे आहे की, ऑनलाइन स्मार्टफोन खरेदी करताना फ्रॉड होण्याची शक्यता जास्त असते आणि ऑफलाइन स्टोअरमधून फसवणूक (फ्रॉड) होण्याची शक्यता फार कमी असते.
२. स्मार्टफोन खरेदी करताना तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे हे ठरवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजेच किंमत, तुमच्या आवडीनिवडी की फोन वापरून पाहण्याचा अनुभव. जर तुम्हाला किंमत महत्त्वाची असेल, तर ऑनलाइन खरेदी करणं चांगलं असू शकतं. कारण सेलमध्ये स्मार्टफोन कमी किमतीत ऑफर केले जातात. कारण ऑनलाइनमध्ये बल्कमध्ये स्मार्टफोन विकले जातात, त्यामुळे कंपन्या तुम्हाला कमी किमतीत फोन देतात आणि तुम्हाला डिस्काउंट ऑफर करतात. तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर (Online vs Offline Buying Smartphone) तुम्हाला विविध ब्रँड्सचा अनेक पर्यायसुद्धा सादर करतात. यामुळे तुम्ही विविध मॉडेल्सची तुमच्या फोनबरोबर तुलना करणे सोपे जाते. तर दुसरीकडे, ऑफलाइन रिटेलर्सकडे जागेच्या, आर्थिक मर्यादांच्या कारणाने तुम्हाला मोजकेच पर्याय असू शकतात.
३. तुम्हाला फोन खरेदी करण्यापूर्वी वापरून पाहायचा असेल तर त्यासाठी रिटेल स्टोअर हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. तुम्ही तुमच्या आवडीचा फोन विकत घेण्यापूर्वी वापरून पाहू शकता, त्याची चाचणी करू शकता. पण, ऑनलाइन खरेदी करताना हा अनुभव किंवा हा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध असणार नाही.
४. याव्यतिरिक्त, स्मार्टफोन खरेदी करताना (Online Vs Offline Buying Smartphone) काही अन्य गोष्टी लक्षात ठेवणेही महत्त्वाचे आहे. कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल अभ्यास करणे, माहिती मिळवणं खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही रिव्ह्यू, तज्ज्ञांची मते वाचा; ज्यामुळे तुम्हाला चांगला निर्णय घेता येईल. याउलट कधी कधी, ऑफलाइन फोन खरेदीसाठी आकर्षक बँक ऑफर्सदेखील उपलब्ध असतात. त्यामुळे, निर्णय घेण्यापूर्वी ऑनलाइन किंवा स्टोरमध्ये उपलब्ध ऑफर्सची तुलना करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.