Amazon vs Flipkart sale: तुम्ही स्वतःसाठी नवीन टीव्ही, स्मार्टफोन किंवा आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ते खरेदी करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. कारण, यावेळी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेल सुरू आहे. सेलमध्ये टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन, आयफोन आणि इतर गॅजेट्सवर चांगली सूट दिली जात आहे. आज आम्ही तुम्हाला Amazon की Flipkart कोणत्या ई-कॉमर्स वेबसाइटवर स्वस्त स्मार्टफोन, टीव्ही आणि आयफोन मिळतील. याविषयी माहिती देणार आहोत. चला तर पाहूया कुठे मिळतील स्वस्तात मस्त वस्तू…
कुठे मिळेल सर्वात स्वस्त iPhone ?
जर तुम्ही iPhone 14 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला Amazon वर स्वस्त मिळेल. Amazon वर iPhone 14 ची किंमत १२८GB व्हेरिएंटसाठी ६६,९९९ रुपये आहे. याशिवाय ICICI बँक कार्डवरून पेमेंट केल्यास तुम्हाला ७५० रुपयांची सूट मिळेल. कंपनी मोबाईल फोनवर ५५,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. तर फ्लिपकार्टमध्ये, iPhone 14 च्या १२८GB व्हेरिएंटची किंमत ६८,९९९ रुपये आहे. अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर १,००० रुपयांची सूट दिली जात आहे. कंपनी ३५,६०० रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील देत आहे.
जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आधी दोन्ही ठिकाणच्या दरांची तुलना करा. वास्तविक, दोन्ही वेबसाइट्सवर वेगवेगळ्या स्मार्टफोन्सवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. उदाहरणार्थ, ६G रॅम आणि १२८GB अंतर्गत स्टोरेजसह Redmi Note 12 Pro 5G च्या व्हेरिएंटची किंमत Flipkart वर २३,९९९ रुपये आहे. Axis आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर ३,००० रुपयांची सूट दिली जात आहे. यासोबतच कंपनी २१,६५० रुपयांची एक्सचेंज ऑफरही देत आहे.
(हे ही वाचा: तुमचाही आधार कार्डवरचा फोटो खराब आलाय? ‘असा’ करा अपडेट, फक्त एका मिनिटात होईल चकाचक )
Amazon बद्दल बोलायचे झाले तर इथे तोच फोन (Glacier Blue) २३,१२८ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. मोबाईल फोनवर २१,५५० रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. याशिवाय ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर ७५० रुपये आणि डेबिट कार्डवर ५०० रुपयांची सूट स्वतंत्रपणे दिली जात आहे.
कुठे मिळेल सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही?
दोन्ही वेबसाईटवर वेगवेगळ्या टीव्हीवर वेगवेगळ्या सवलती दिल्या जात आहेत. Mi 5A 80 cm (32 इंच) HD रेडी LED स्मार्ट Android TV ची किंमत फ्लिपकार्टवर ११,९९९ आहे. तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने टीव्ही खरेदी केल्यास तुम्हाला १५,०० रुपयांची सूट मिळेल. त्याचवेळी, Amazon वर या टीव्हीची किंमत फक्त ११,९९९ रुपये आहे, परंतु येथे SBI आणि ICICI बँक कार्डवर फक्त १,२५० रुपयांची सूट दिली जात आहे.
एकूणच, दोन्ही वेबसाइटवर वेगवेगळ्या सवलती दिल्या जात आहेत. आमचा सल्ला आहे की कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तुम्ही दोन्ही ई-कॉमर्स वेबसाइटची तुलना करा.