सध्याच्या काळामध्ये डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. हल्ली प्रत्येकजण जवळ कॅश बाळगण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंटच करताना दिसून येतो. प्रत्येकजण हल्ली upi चा वापर करतो. आपल्या फोनमध्ये यासाठी गुगल पे, फोन पे, पेटीअम आणि अन्य apps असतात ज्यामधून आपण ऑनलाइन व्यवहार करतो. upi पेमेंट ही इतर कोणत्याही ऑनलाइन पेमेंट पद्धतीपेक्षा वेगवान आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मात्र जसजसे ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण वाढले आहे तशी ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. ऑनलाईम पेमेंट करणाऱ्यांची फसवणूक करून त्यांचे पैसे चोरण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन युक्त्या लढवत असतात. त्यामुळेच upi पेमेंट करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल जाणून घेऊयात.
विश्वसनीय UPI Apps चा वापर करावा
सध्या ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी अनेक upi apps उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण ऑनलाइन पेमेंटसाठी अधिकृत व सुरक्षित यूपीआय App वापरणे आवश्यक असते. लोकप्रिय व सुरक्षित Apps मध्ये सध्या Google Pay, PhonePe आणि Paytm यांचा समावेश आहे. या या अॅप्सना सर्व प्रमुख बँका आणि वित्तीय संस्थांचा पाठिंबा आहे. त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित असल्याचा विश्वास तुम्हाला वाटतो.
UPI पिन कोणालाही सांगू नये
तुमचा upi पिन हा तुमचे पैसे अधिक सुरक्षित ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे तुमचा पिन सुरक्षित असणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा upi पिन कोणाशीही शेअर करू नये. तसेच एखादी वेबसाइट तुम्हाला अधिकृत वाटत नसेल तर तिथे तुमचा पिन टाकू नये. तसेच तुम्ही तुमचा पिन हा काही कालावधीनंतर बदलत राहणे आवश्यक आहे.
कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन पेमेंट करत असताना प्राप्तकर्त्याच्या डिटेल्सची नीट खात्री करणे आवश्यक आहे. यामध्ये प्राप्तकर्त्याचे नाव , UPI आयडी आणि मोबाईल नंबर याचा समावेश होतो. तुम्ही पेमेंट करण्याआधी UPI App वर ‘व्हेरिफाय पेमेंट अॅड्रेस’ फीचरचा वापर करून प्राप्तकर्त्याची ओळख देखील करू शकता.
आपले डिव्हाईस सुरक्षित ठेवावे
तुमचे डिव्हाईस हॅकर्स कधीही हाक करू शकतात. तसे होऊ नये म्हणून सुरक्षेसाठी अँटीव्हायरस किंवा तुमची ऑपरेटिंग सिस्टीम आणि Apps कायम अपडेट ठेवावेत. जेणेकरून तुमचे डिव्हाईस सुरक्षित राहू शकते. तसेच प्रत्येकजण हल्ली सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या डिव्हाईसला पासवर्ड ठेवत असतो. तो पासवर्ड अधिक स्ट्रॉंग असणे आवश्यक असते. जेणेकरून तुमचे डिव्हाईस अधिक सुरक्षित राहील.