व्हाट्सअॅप मीडिया प्लॅटफॉर्म आहे. हे मेटाच्या मालकीचे आहे. यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. एकमेकांना फोन करू शकता , आपले फोटोज स्टेटसला पोस्ट करू शकता. मात्र कधी कधी दिवसभराच्या कामांमुळे तुम्ही थकलेले असता आणि तुमच्या व्हाट्सअॅपवर भरपूर मेसेज आलेले असतात पण थकल्यामुळे तुम्हाला त्याचा रिप्लाय देण्याची इच्छा नसते. आता तुम्हाला हे करण्याची गरज पडणार नाही करणं आता तुमचे रिप्लाय देण्याचे काम हे ChatGpt करणार आहे.
OpenAI चा ChatGpt हा chatbot आता व्हाट्सअॅपचे रिप्लाय देण्यास मदत करणार आहे. तुम्ही आता Github द्वारे चॅटजीपीटीला व्हाट्सअॅपसह एकत्रित करू शकता. सोप्या भाषेत सजून घ्यायचे झाले तर तुम्ही चॅटबॉट ला Github च्या माध्यमातून व्हाट्सअॅपमध्ये आणू शकता.
सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेल्या डॅनियल ग्रॉस याने पायथन स्क्रिप्ट (कोडिंग नोट ) तयार केली आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही व्हाट्सअॅपसह चॅटजीपीटी एकत्रित करू शकता. हे करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा वेबवरूनच सर्व आवश्यक भाषेच्या फाईल्स डाउनलोड करा. सर्व फाईल्स डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला WhatsApp-gpt-main हा फोल्ड ओपन करावा लागेल आणि server.py हे डॉक्युमेंट अॅक्टिव्हेट करावे लागेल. इथून चॅटजीपीटी आणि व्हाट्सअॅपचे एकत्रीकरण होईल. सर्व्हरसुरु झाल्यानंतर तुम्हाला IS असे टाईप करावे लागेल आणि एंटर करावे लागेल. यानंतर python server.py वर क्लिक करावे लागणार आहे. असे केल्यामुळे तुमचा मोबाईल नंबर OpenAI च्या चॅटपेजवर रजिस्टर होईल. यंततर तुम्ही हे कन्फर्म केले की, तुम्हाला GPT WhatsApp वर Open AI चे चॅट दिसेल.
जे लोक आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत किंवा AI च्या संभाव्यतेमध्ये खोलवर जाऊ इच्छितात ते ही पद्धत वापरून पाहू शकतात. हा चॅटबॉट इतका सोपा आणि सामान्य प्रतिसाद देतो की समोरच्या व्यक्तीला हे कळणार नाही कि मेसेज तुम्ही केला आहे की AI ने. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे इंटरनेटवर चॅट जीपीटीच्या नावाने अनेक प्रकारचे अॅप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर, लिंक्स इत्यादी उपलब्ध आहेत. त्यामुळे डाउनलोड करताना त्याबद्दलचे सर्व तपशील खरे आहेत की नाहीत हे तपासून पाहणे आवश्यक आहे. ओपनआयने अद्याप कोणतेही चॅट जीपीटी अॅप जारी केलेले नाही किंवा मेटाने त्याच्या अॅप्समध्ये अशी कोणतीही सेवा कनेक्ट केलेली नाही.
सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते.