गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये ओपनएआयने आपला ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला आहे. तेव्हापासून अनेक ठिकाणी याचा वापर केला जात आहे. चॅटजीपीटीशी स्पर्धा करण्यासाठी गुगलने देखील आपला AI Bard लॉन्च केले आहे. आता चॅटजीपीटी वापरणे पहिल्यापेक्षा अधिक सोपे झाले आहे. कारण हे माध्यम आता अॅप स्वरूपात उपलब्ध झाले आहे. म्हणजेच आता वापरकर्त्यांना हे वेब ब्राऊझरच्या माध्यमातून Acess करण्याची गरज नाही.
सध्या हे अॅप केवळ आयफोन वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. हे अॅप आता भारतात देखील लॉन्च झाले आहे. आता तुम्ही हे अॅप डाउनलोड करून सहजपणे वापरू शकता. chatgpt हा एक कृत्रिम चॅटबॉट आहे. हा AI चॅटबॉट मजकूर तयार करणे, भाषांतर करणे, विविध प्रकारचा कंटेंट लिहिणे, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणे यासारखी कामे करतो. याबाबतचे वृत्त इंडिया टूडे ने दिले आहे.
आता आपण ChatGpt हे App आयफोनवर कसे वापरायचे ते पाहुयात.
१. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या आयफोनच्या अॅप स्टोअरवर जा.
२. त्यावर ChatGpt सर्च करा.
३. तिथे तुम्हाला chatgpt ची अनेक फेक अॅप आहेत. मात्र ओपनएआयचे असेल तेच अॅप डाउनलोड करावे.\
हेही वाचा : एलॉन मस्कनं मागितली ट्विटर युजर्सची माफी; म्हणाला, “सॉरी, ट्विटर मोबाईल अॅप…”
४. अॅप डाउनलोड केल्यांनतर तुम्हाला साइन इन करण्यास सांगितले जाईल.
५. तुमचा जीमेल आयडी किंवा Apple आयडीचा वापर करून साइन इन करावे.
६. साइन इन केल्यावर HI या मेसेजने तुमचे स्वागत केले जाईल.
७. या अॅपची चॅट विंडो ही मेसेजिंग अॅपसारखीच वाटते.
८. आता तुम्ही या अॅपवर तुमचे प्रश्न विचारू शकता व उत्तरे देखील मिळवू शकता.