ओपन AI कंपनीमध्ये संशोधन शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या प्रफुल धारिवाल याचे कौतुक, ओपन AI कंपनीच्या सीईओ सॅम ऑल्टमन यांनी सोशल मीडियावर केले आहे. इतकेच नाही, तर GPT-4o निर्माण करण्याचेदेखील पूर्ण श्रेय प्रफुल्लला दिले आहे. पुण्याच्या प्रफुलचे “कौशल्य, दृष्टिकोन, जिद्द आणि कामावरील श्रद्धा” याशिवाय GPT-4o निर्माण झाले नसते, असे सॅम ऑल्टमन म्हणतात. GPT-4o हे ChatGPT-4 ची सुधारित आवृत्ती आहे.

या मॉडेलच्या लाँचबद्दल बोलायचे झाले तर प्रफुल धारिवालने त्याच्या एक्स [पूर्वीचे ट्विटर] अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये “GPT-4o [o म्हणजे ओम्नी] हे ओम्नी टीमने बनवलेले पहिले संपूर्ण मल्टीमोडल मॉडेल आहे. याचे लाँच हे सर्वांच्या मेहेनतीचे फळ आहे. तरीही, मी माझ्या टीममधील काही कमाल सहकाऱ्यांचे आभार मानतो, ज्यांच्यामुळे हे मॉडेल प्रत्यक्षात खरे उतरले आहे!”, असे लिहिले आहे.

General Dwivedi expressed his views on Pune on the occasion of Army Day at the parade ground of the Bombay Engineer Group Pune news
लष्करप्रमुखांकडून पुण्याचा गौरव, म्हणाले, लष्करासाठी पुणे ‘पॉवर हाउस’
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील अशिक्षित अधिपतीचं खऱ्या आयुष्यात किती शिक्षण झालंय माहितेय का?
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”

प्रफुल्लच्या या पोस्टवर सॅम ऑल्टमननीदेखील एक पोस्ट लिहिली. “GPT-4o हे @prafdhar च्या कौशल्य, दृष्टिकोन, जिद्द आणि कामावरील श्रद्धा यामुळे शक्य झाले आहे. त्याच्या [आणि इतर अनेकांच्या] मेहेनतीमुळे आपण जो संगणक वापरत आहोत, त्यामध्ये क्रांती घडण्यास मदत होईल अशी मला आशा आहे.” प्रफुल्लचे असे कौतुक सॅम ऑल्टमनने या पोस्टमधून केले आहे.

पोस्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हेही वाचा : Googleच्या जेमिनी-AI सह करता येईल ‘जेवणाचे प्लॅनिंग, व्हिडीओवरून शोध’! काय आहेत भन्नाट फीचर्स, पाहा

कोण आहे प्रफुल्ल धारिवाल?

प्रफुल्ल धारिवालने २००९ साली भारत सरकारतर्फे नॅशनल टॅलेंट सर्च शिष्यवृत्ती जिंकली असून, चीनमधील आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदकदेखील पटकावले होते. इतकेच नाही, तर २०१२ आणि २०१३ साली प्रफुल्लने आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड व आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदके जिंकली होती. तसेच, २०१३ साली त्याला आबासाहेब नरवणे स्मृती हा वार्षिक पुरस्कारही देण्यात आला होता.

“मी जेव्हा बारावीमध्ये शिकत होतो, तेव्हा माझे संपूर्ण लक्ष अभ्यासावर होते. कारण मला त्यावेळेस JEE साठी तयारी करून आयआयटीमध्ये जायचे होते. परंतु, आता माझी एमआयटीमध्येदेखील निवड झाली असल्याने मला प्रचंड आनंद झाला आहे”, असे प्रफुल्लने मिड-डे वृत्तपत्राला सांगितले असल्याचे, हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून समजते.

प्रफुल्लने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून संगणक विज्ञान (गणित) या विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले. नंतर मे २०१६ साली रिसर्च इंटर्न म्हणून OpenAI मध्ये रुजू झाला होता. प्रफुल्ल GPT-3, DALL-E 2, ज्यूकबॉक्स आणि ग्लो यांच्या सह-निर्मात्यांपैकी एक आहे.

Story img Loader