OpenAI ने २०२२ मध्ये ChatGpt लॉन्च केले होते. हा एक कृत्रिम चॅटबॉट आहे. सुरुवातीला ठराविक लोकच याचा वापर करत होते. काहीजण कविता लिहीत होते. काही जाण्याचा वापर गाणे लिहिण्यासाठी, निबंध लिहिण्यासाठी आणि अजून बरेच काही गोष्टींसाठी करत होते. चमकणारी प्रत्येक गोष्टच सोन नसते या म्हणीचा अर्थ लवकरच लोकांना समजायला लागला. AI चॅटबॉटच्या काही नोकऱ्या बदलण्याच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली आणि जसजसा वेळ जात आहे तसतशी याबाबतची चिंता अधिकच वाढत आहे. चॅटजीपीटीची मूळ कंपनी असलेल्या ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनीही हे मान्य केले होते की व्हायरल चॅटबॉट अनेक नोकऱ्या काढून टाकू शकते.
एका पॉडकास्ट मुलाखतीमध्ये ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले की, चॅटजीपीटीमुळे जी लोकं ग्राहक सेवेशी संबंधित आहेत अशा लोकांची नोकरी लवकर जाऊ शकते. तसेच ते म्हणाले, AI चा हस्तक्षेप लवकरच ग्राहक सेवेमध्ये दिसून येईल.
हेही वाचा : अखेर ठरले! भारतात लवकरच लॉन्च होणार Nothing कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन, AMOLED डिस्प्लेसह…
चॅटजीपीटी हा आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित चॅटबॉट आहे. ज्यात सर्व सार्वजनिकरित्या उपलब्ध डेटा दिलेला आहे. हा चॅटबॉट तुमच्यासाठी काही सेकंदात कविता, पॅराग्राफ, ईमेल इत्यादी अनेक गोष्टी करू शकतो. ओपनएआयने अलीकडेच आपली नवीन सिरीज GPT -4 लॉन्च केली आहे. ही नवीन सिरीज सध्या केवळ चॅटजीपीटी प्लस असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. नवीन सिरीज पूर्वीच्या सिरींजपेक्षा अधिक प्रगत व अचूक आहे. यामध्ये लोक फोटोच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकतात.
ChatGPT जेव्हा लॉन्च करण्यात आले होते तेव्हा हा चॅटबॉट न्यूयॉर्कमधील काही शाळांमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली होती. कारण विद्यार्थी त्यांच्या असाइन्मेंट्स लिहिण्यासाठी त्याचा वापर करत होते. मात्र आता शाळा आता या कल्पनेचा स्वीकार करत असून शिक्षक देखील चॅटबॉट वर विश्वास ठेवत आहेत.