Who Is OpenAI’s First Chief Economist : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय या विषयावर संशोधन करणाऱ्या एका अग्रगण्य अमेरिकन संस्थेचे नाव म्हणजे ‘ओपन एआय.’ ओपन एआय या संशोधन प्रयोगशाळेने प्रथमच आरोन चॅटर्जी यांची मुख्य अर्थशास्त्रज्ञ (OpenAI’s First Chief Economist) म्हणून नियुक्ती केली आहे. आरोन चॅटर्जी यांनी यापूर्वी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या अध्यक्षतेखालील वाणिज्य विभागात मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून आणि राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेत वरिष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून काम केले आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीव्यतिरिक्त ते ड्यूक विद्यापीठात व्यवसाय, सार्वजनिक धोरणाचे एक प्रतिष्ठित प्राध्यापकदेखील आहेत.

आता AI च्या आर्थिक परिणामाच्या संशोधनाचे नेतृत्व करणार :

OpenAI मधील त्यांच्या नवीन भूमिका म्हणजे आरोन चॅटर्जी आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) आर्थिक परिणामाच्या संशोधनाचे नेतृत्व करतील. त्यांचे संशोधन एआयची आर्थिक वाढ, नोकरीच्या संधींवर कसा परिणाम करू शकते यावर लक्ष देईल. ही नियुक्ती OpenAI अर्थशास्त्र आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्यातील संबंधांचा अभ्यास करणार आहे, जेणेकरून या तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता येईल.

हेही वाचा…How To Avoid Scams : डिजिटल फ्रॉडपासून सावध राहा; नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचा सल्ला वाचा

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण (Who is OpenAI’s First Chief Economist) :

स्वतःला Nerd समजणारे आरोन चॅटर्जी यांना लहानपणापासूनच अंकांची आवड होती. त्यांना अर्थशास्त्रात करिअर करायचे होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आरोन चॅटर्जींनी २००० मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून अर्थशास्त्रात बी.ए.केले. त्यानंतर २००६ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. त्यांची संशोधनाची आवड प्रामुख्याने उद्योजकता, नवकल्पना आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी यांवर केंद्रित होती.

ओपन एआयला फायदा होण्यासाठी चिप डेव्हलपमेंटमध्ये कौशल्य :

चॅटर्जी यांनी बायडेन २०२२ CHIPS कायद्याच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्याने अमेरिकेत संगणक चिप विकासासाठी सुमारे $280 अब्ज प्रदान केले. त्यांचे ज्ञान आणि राजकीय संबंध OpenAI साठी फायदेशीर ठरू शकतात. कारण त्यांनी स्वतःचे चिप डिझाइन करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. चॅटर्जींच्या नवीन भरतीने (OpenAI’s First Chief EconomistAI ) तंत्रज्ञानाच्या वेगाने विकसित होत असलेल्या डोमेनमध्ये OpenAI चे स्थान आणखी मजबूत होईल.

त्याचबरोबर OpenAI ने स्कॉट स्कूल्सना नवीन चीफ कॉम्पलिअन्स ऑफिसर म्हणून नियुक्त केले आहे. स्कॉट स्कूल्स माजी सहयोगी डेप्युटी ॲटर्नी जनरल आणि Uber चे अनुपालन प्रमुख, OpenAI च्या बोर्ड आणि इतर संघांबरोबर कायदेशीर आवश्यकता आणि नैतिकता यावर काम करतील. या हाय-प्रोफाइल अपॉईंटमेंट्स OpenAI ची नैतिक AI विकास आणि त्याच्या ऑपरेशन्समध्ये नियामक अनुपालनाची बांधिलकी दर्शवतात.