सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळा तुम्हाला हवी असलेली माहिती मिळते.
OpenAI ने नुकतीच यूएस मध्ये ChatGPT Plus सेवा सुरू केली आहे. यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. फ्री व्हर्जनच्या तुलनेत वापरकर्त्यांना प्लस व्ह्जर्नमध्ये अधिक फीचर्स मिळतात. पेड सब्स्क्रिप्शन प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना वेगाने त्यांची उत्तरे मिळतात. यामध्ये फीचर्स येतील ते पेड सब्स्क्रिप्शन घेतलेल्या वापरकर्त्यांना वापरता येणार आहेत. एका रिपोर्टनुसार कंपनीने चॅटजीपीटी प्लस सर्व्हिस एक Turbo Mode सुरु केला आहे.
OpenAI ने सुरु करण्यात केलेल्या टर्बो मोडसह प्लस वापरकर्त्यांना अधिक वेगवान सर्व्हिस मिळण्याची शक्यता आहे. माध्यमांच्या अहवालानुसार काही वापरकर्त्यानी असा दावा केला आहे की , टर्बो मोड अल्फा फेजमध्ये आहे आणि चॅटजीपीटी प्लस मेंबर्ससाठी हे फिचर लवकरच रिलीज होण्याची शक्यता आहे. या शिवाय हा मोड प्लस पेड सब्स्क्रिप्शन असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी डिफॉल्टरूपात सक्रिय केला जाईल.
तसेच काही वापरकर्त्यानी टर्बो मोडबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. चॅटजीपीटीच्या या नवीन मोडबद्दल त्यांनी तक्रार देखील केली आहे. त्यांच्या मतानुसार टर्बो मोड डिफॉल्ट मोडच्या तुलनेत कमी परिणाम देतो.काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, टर्बो मोड हा डिफॉल्ट मोडाची अपग्रेड करण्यात आलेली सिरीज आहे. हा मोड रिअल-टाइम अॅप्लिकेशनसाठी आहे.