OpenAI’s Search Engine : ओपन एआयने (OpenAI) नोव्हेंबर २०२२ मध्ये चॅटजीपीटी जगासमोर आणले. या टूलने कमी कालावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. एखाद्या शब्दाचा अर्थ शोधण्यापासून ते निबंध लिहिण्यापर्यंत चॅटजीपीटी खूप काही करू शकते. चॅटजीपीटी हे आर्टिफिशियल इंटेलिजेन्स टूल आहे. हे एक जनरेटिव प्री-ट्रेंड ट्रान्स्फॉर्मर भाषा मॉडेल असून, ते एआयने विकसित केले आहे, जे तुम्हाला माणसाप्रमाणे उत्तरे देते. म्हणजेच गूगलसारखे एक दुसरे पोर्टल आहे, असे म्हणायला हरकत नाही.

पण, आता ओपन एआयने (OpenAI) नुकतीच त्यांची स्वतःची नवीन चॅटजीपीटी सर्च सर्व्हिस (OpenAI’s Search Engine) लाँच केली आहे. AI चॅटबॉट या वेबवर संबंधित माहिती शोधण्यासाठी एक नवीन मार्ग उपलब्ध करून देतो आहे. OpenAI नुसार, ChatGPT आता इंटरनेट सर्चिंगमध्ये लक्षणीयरीत्या प्रोफिशियंट (proficient) झाले आहे. ते युजर्सच्या प्रश्नांना लवकर आणि वेळेत उत्तरे देते. चॅटबॉटचा प्रॉम्प्ट-आधारित इंटरफेस आता तुम्हाला माहिती, डेटा शोधण्यास मदत करू शकणार आहे.

Loksatta Ganeshotsav Quiz
लोकसत्ता गणेशोत्सव क्विझच्या विजेत्यांचा सन्मान
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
chandramukhi bhagaathie horror movies ott
OTT वर उपलब्ध आहेत ‘हे’ भयंकर भयपट, एकटं बसून पाहायची वाटेल भीती; पाहा यादी…
AI chatbots like ChatGPT and Perplexity can also be used as search engines
Chromeवर Google Searchऐवजी ChatGPT आणि Perplexity AI कसे बदलावे? जाणून घ्या सोपी पद्धत
effective use of artificial intelligence in bhabha atomic research centre
कुतूहल : बीएआरसी आणि टीआयएफआर
who is OpenAI's first chief economist
OpenAI’s First Chief Economist : OpenAIचे पहिले-वहिले मुख्य अर्थतज्ज्ञ! कोण आहेत आरोन चॅटर्जी? जाणून घ्या तीन मुद्द्यांमध्ये
an overview of explainable artificial intelligence
 कुतूहल : पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन
transparent artificial intelligence communication skills
कुतूहल : पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्ता – संवाद कौशल्य

तर हे ‘वेब सर्च’ फीचर (OpenAI’s Search Engine) ChatGPT च्या ऑफिशियल साईटवर, डेस्कटॉप पीसी, मोबाईल डिव्हाइससाठी अधिकृत ॲप्सद्वारे उपलब्ध असेल. त्यात चॅटजीपीटी प्लस युजर्सना सध्या प्रवेश दिला जाईल आणि पुढील महिन्यात सर्व युजर्सना विनामूल्य प्रवेश दिला जाईल.

हेही वाचा…What is Netflix Moments : आता नेटफ्लिक्सवर मालिका, चित्रपटातील आवडता सीन शेअर करण्याची सोय; वाचा कसं वापरायचं हे फीचर

बातम्या आणि ब्लॉगच्या लिंक्सचा समावेश (OpenAI’s Search Engine)

OpenAI ने नमूद केले की, हा वेब सर्च पूर्वीसारखा उपयुक्त असेल. त्यामुळे अचूक माहिती शोधणे सोपे होणार असल्याचा दावा टेक कंपनीने केला आहे. ChatGPT सर्चसह युजर्सना यापुढे एकाधिक सर्च क्वेरी किंवा ब्राउझ लिंक करण्याची आवश्यकता नाही. त्यामध्ये बातम्या आणि ब्लॉगच्या लिंक्सचा समावेश आहे.

ChatGPT च्या शोध परिणामांमध्ये आता माहिती उजव्या बाजूस दिसेल. OpenAI ने सांगितले की, त्यांच्या शोध मॉडेलमध्ये GPT-4 हे एक विशेष प्रकारचे टूल वापरण्यात आले आहे, जे नवीन ‘सिंथेटिक’ डेटा तंत्रांद्वारे प्रशिक्षित केले गेले आहे. हे शोध परिणाम काही अज्ञात तृतीय-पक्ष शोध पुरवठादार आणि उच्च गुणवत्तेचे कन्टेन्ट यांद्वारे सुधारित केले जातात आणि त्यामुळे अचूक माहिती मिळण्यास मदत होते.

ChatGPT चे सर्च फीचर पूर्वीच्या सर्च जीपीटी (Search GPT) प्रोटोटाईपच्या फीडबॅकच्या आधारे लाँच करण्यात आले आहे. OpenAI च्या भाषा मॉडेलमध्ये सतत सुधारणा करण्याची योजना आखली जात आहे. की कन्टेन्ट पार्टनर्स असोसिएटेड प्रेस, कॉन्डे नास्ट, फायनान्शियल टाइम्स, गेडी, ले माँडे, रॉयटर्स व टाइम यांचा त्यात समावेश आहे. याव्यतिरिक्त कोणताही प्रकाशक OpenAI कॉलर्सना त्यांच्या साइटला सर्च रिझल्टमध्ये समाविष्ट करण्याची परवानगी देणेसुद्धा निवडू शकतात तेही कोणताही शुल्क न आकारता.

Le Monde च्या CEO लुई ड्रेफसने सांगितले की, माणसाच्या भविष्यातील पिढ्या माहिती मिळविण्यासाठी AI आधारित सर्चचा वापर करतील. त्यामुळे हे फ्रेंच प्रकाशन डिजिटल बदलात अग्रेसर राहील. Vox Media च्या अध्यक्ष पॅम वॉटरस्टाइन यांनी म्हटले की, ChatGPT च्या वापरामुळे बातम्या स्रोतांबाबतचा विश्वास वाढेल.