गेल्या वर्षी ओपनएआयने नोहेंबर महिन्यात ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला आहे. सध्या संपूर्ण जगभरामध्ये AI चॅटबॉट लोकप्रिय झाला आहे. AI चॅटबॉटने त्‍याच्‍या मानवासारखा प्रतिसाद आणि कार्ये पूर्ण करण्‍याच्‍या क्षमतेमुळे त्‍याच्‍या त्‍यासाठी त्‍याच वेगाने लोकप्रियता मिळवली, जशी AI चॅटबॉटने यापूर्वी कधीच मिळवली नव्हती.याचा वापर सध्या अनेक ठिकाणी केला जात आहे. याचा वापर निबंध लेखन, कंटेंट क्रिएट करणे, अवघड माहिती सोपी करणे, कविता तयार करणे अशा अनेक कामांसाठी केला जातो. यानंतर डेव्हलपर्सनी GPT-4 लॉन्च केले. हे आधीच्या सिरींजपेक्षा जास्त प्रगत असल्याचे सिद्ध झाले आहे.

तथापि, ChatGpt वापरकर्त्यांची सेवा करण्याची क्षमता वाढवण्यासाठी तुमचे चॅट्स सेव्ह करते आणि संग्रहित करून ठेवते. OpenAI च्या गोपनीयता धोरणानुसार, कंपनी कायदेशीर व्यावसायिक हेतूंसाठी नाव, ईमेल पत्ता आणि देयक तपशील यासारखी वैयक्तिक माहिती गोळा करू शकते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच लोकांचा एक गट ओपनएआयचे उत्पादन प्रशिक्षित करण्यासाठी ग्राहकांचा डेटा वापरण्याबद्दल वाद घालत आहे. इटली सरकारने ChatGpt हे ‘बेकायदेशीरपणे वापरकर्त्यांचा डेटा गोळा करतो’ असा आरोप करत त्यावर बंदी घातली आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Aditya Thackeray Dhruv Rathee
Aditya Thackeray : मतदानाआधी ध्रुव राठीचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं आव्हान, आदित्य ठाकरे तयार; म्हणाले, “हे पण…”
Uddhav Thackeray
कोकणातीन सभेतून उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल; दीपक केसरकरांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
amol kolhe bag checked after uddhav thackeray
उद्धव ठाकरेंनंतर महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याच्या बॅगची तपासणी, नेमकं काय घडलं?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

हेही वाचा : Vivo X90 Series: विवो आज लॉन्च करणार ‘हे’ दोन तगडे स्मार्टफोन्स; OLED डिस्प्लेसह मिळणार…

चॅटजीपीटीने ग्राहकांचा डेटा वापरल्याचा आरोप झाल्यामुळे लोकांमध्ये चिंता निर्माण झाली . मात्र आता कंपनीने वापरकर्त्यांसाठी त्यांची चॅट हिस्ट्री टॉगल करण्याचा पर्याय आणला आहे. हा पर्याय एकदा सुरु केला की AI चॅटबॉटसह झालेले तुमचे चॅट्स स्टोअर केले जाणार नाहीत. तर हा पर्याय कसा सुरु करावा याच्या सोप्या स्टेप्स जाणून घेऊयात.

१. सर्वात पहिल्यांदा ChatGpt या वेबसाईटवर क्लिक करा.
२. त्यानंतर तुम्हाला त्या वेबसाईटच्या खालील बाजूस तुम्हाला तुमचा प्रोफाइल फोटो आणि नाव दिसेल.
३. त्यानंतर प्रोफाइल आणि नावाशेजारी तुम्हाला तीन डॉट्स दिसतील . त्यावर कॅलसिक करून सेटिंग्ज हा पर्याय निवडावा.

हेही वाचा : WhatsApp Features 2023: “आजपासून तुम्ही जास्तीत जास्त…” ; मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा

४. त्यानंतर तुम्हाला एक नवीन पर्याय दिसेल. ज्यामध्ये डेटा कंट्रोल्स असे लिहिलेले दिसेल.
५. चॅटजीपीटीवरील तुमचे चॅट्स चॅटजीपीटीने सेव्ह करायला नको असल्यास Chat History आणि Training’ हा पर्याय बंद करावा.

या महिन्याच्या सुरुवातीला इटली सरकारने गोपनियतेचा भंग करत असल्याचा आरोप करत ChatGpt वर तात्पुरती बंदी घातली आहे. इटालियन डेटा संरक्षण प्राधिकरणाने (Italian Data Protection Authority ) गेल्या आठवड्यामध्ये ChatGpt वर बंदी घातली आहे. या आधी फ्रान्स युनिव्हर्सिटीनेदेखील या चॅटबॉटवर बंदी घातली आहे. संपूर्ण जगभरामध्ये OpenAI ने लॉन्च केलेला Chatgpt खूप लोकप्रिय होत आहे. हा एक कृत्रिम chatbot आहे. तसेच तुम्ही त्याला कोणताही प्रश्न विचारला की हा चॅटबॉट त्याच्याकडे असलेल्या माहितीनुसार तुम्हाला उत्तरे देतो.

AI मॉडेलपासून गोपनीयतेसंबंधित चिंता वाटत होती असे इटलीचे डेटा संरक्षण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इटालियन प्रायव्हसी वॉचडॉगने सांगितले की, त्यांनी ChatGPT तयार करणारी कंपनी OpenAI वर तातडीने पण तात्पुरते निर्बंध लादले आहेत कारण इटालियन वापरकर्त्यांच्या डेटावर प्रक्रिया करण्यापासून रोखता यावे. याशिवाय इटलीची प्रायव्हसी वॉचडॉग चॅटबॉटने युरोपियन संघाचे जनरल डेटा प्रोटेक्शन (जीडीपीआर) चे उल्लंघन केले आहे की नाही याची चौकशी करण्याची शक्यता आहे.