आज आपण Realme आणि Oppo या दोन मोबाइल कंपन्यांनी लॉन्च केलेल्या आपल्या नवीन स्मार्टफोनमधील तुलना जाणून घेणार आहोत. म्हणजेच या दोन्ही फोनमधील बॅटरी, फीचर्स आणि किंमत यांची तुलना पाहणार आहोत. स्मार्टफोन ही आजच्या काळातील प्रत्येकाची गरज बनला आहे. आपली बरीचशी कामे ही स्मार्टफोनच्या मदतीने होत असतात. आज आपण Oppo A78 आणि Realme 11 5G या दोन फोन्सबद्दल जाणून घेणार आहोत.

Realme 11 5G: स्पेसिफिकेशन्स

ड्युअल सिम Realme 11 5G हा फोन अँड्रॉइड १३ आधारित Realme UI 4.0 वर चालतो. त्यात वापरकर्त्यांना ६.७२ इंचाचा फुल एचडी + सॅमसंग AMOLED डिस्प्ले मिळतो. यात फोनमध्ये 6nm मीडियाटेक Dimensity 6100+ SoC हुड अंतर्गत येते. या फोनमध्ये ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. हा हँडसेट डायनॅमिक रॅम विस्तार (DRE) फीचरसह येतो जो मोफत स्टोरेज व्हर्च्युअल मेमरी म्हणून वापर करतो. यामधील मेमरी १६ जीबी पर्यंत वाढवता येते.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ISRO docked SpaDeX satellites space
ISRO Mission : इस्रोची आणखी एक मोहीम फत्ते, अवकाशात दोन उपग्रहांची केली यशस्वी जोडणी
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
150 years of India Meteorological Department
अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
spadex satellites successfully come 3 meters to each other says isro
‘स्पाडेक्स’ मोहिमेत दोन्ही उपग्रह तीन मीटर अंतरावर
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!

हेही वाचा : VIDEO: ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ६७W फास्ट चार्जिंगसह लॉन्च झाला ‘हा’ दमदार स्मार्टफोन, किंमत फक्त…

Oppo A78 चे फीचर्स

नवीन लॉन्च झालेल्या ओप्पो A78 ड्युअल सिम (नॅनो) चा सपोर्ट मिळतो. हा फोन कंपनीच्या ColorOS 13.1 स्किनसह Android च्या अनस्पेसिफाईड व्हर्जनवर चालतो. यात ग्राहकांना ६.४२ इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले मिळतो. तसेच हा फोन Adreno 610 GPU सह ८ जीबी LPDDR4X रॅम शी जोडलेले आहे. 

Realme 11 5G: कॅमेरा व बॅटरी

व्हॅनिला रिअलमी ११ ५जी मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आपले असून त्यात १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. Realme 11 5G मध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. तसेच याला ६७W चार्जिंग सपोर्ट मिळतो. फास्ट चार्जिंग टेक्नलॉजीमुळे केवळ १७ मिनिटांमध्ये बॅटरी ० ते ५० टक्के इतकी चार्ज होइल असा दावा करण्यात आला आहे. 

Oppo A78 : कॅमेरा व बॅटरी

ओप्पोच्या या नवीन फोनमध्ये ७७ डिग्री व्ह्यू फील्ड आणि f/1.8 अपर्चरसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा , ८९ डिग्री व्ह्यू फील्डसह २ -मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.  Oppo A78 mdhye 128 जीबी इनबिल्ट UFS 2.2 स्टोरेज मिळते. जे मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. कनेक्टिव्हिटीसाठी G LTE, Wi-Fi, Bluetooth 5, GPS आणि A-GPS सपोर्ट मिळतो. याला ५००० mAh क्षमतेची बॅटरी व त्याला ६७ W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट मिळतो.

हेही वाचा : भारतात Realme 11 5G लॉन्च, १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मिळणार…., किंमत २० हजारांपेक्षा कमी

Oppo A78 किंमत

भारतात Oppo A78 ची किंमत ही १७,४९९ रुपये आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या एकाच पर्यायामध्ये हा फोन उपलब्ध आहे. हा फोन Aqua Green आणि Mist Black या दोन रंगात उपलब्ध आहे. हा फोन खरेदीदार कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर, फ्लिपकार्टद्वारे खरेदी करू शकतात.

Realme 11 5G: किंमत 

Realme 11 5G ची किंमत १८,९९९ रुपये आहे. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेले व्हेरिएंट उपलब्ध आहे. तर ८/२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रूपये आहे. हा फोन ग्लोरी गोल्ड आणि ग्लोरी ब्लॅक या रंगात येतो. २९ ऑगस्टपासून याची विक्री सुरू होणार आहे. या फोनची विक्री फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून तसेच मुख्य रिटेल स्टोअर्सवरून होणार आहे. सुरुवातीची ऑफर म्हणून फ्लिपकार्टवर कंपनी इन्स्टंट डिस्काउंट देत आहे. एसबीआय आणि एचडीएफसी खरेदी करणे खरेदी केल्यास १,५०० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

Story img Loader