सध्या भारतीय बाजारामध्ये अनेक मोबाइल कंपन्या आपले नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत आहेत. त्याच आता काही कंपन्यांनी आपले फोल्डेबल स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. ओप्पो ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. १३ ऑक्टोबर रोजी ओप्पोने आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने या फोनमध्ये मिडियाटेक डायमेन्सिटी 9200 SoC प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. ओप्पो Find N3 या फोल्डेबल फोनची विक्री भारतात आजपासून सुरु झाली आहे. या स्मार्टफोनची स्पर्धा थेट Samsung Galaxy N3 Flip बरोबर होणार आहे.

Oppo Find N3 Flip : फीचर्स

कंपनीने Oppo Find N3 Flip हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि दोन रंगांमध्ये लॉन्च केले आहे. Oppo Find N3 Flip मध्ये, तुम्हाला १२०Hz च्या रिफ्रेश रेटसह ३.२६ इंच बाह्य डिस्प्ले आणि ६.८ इंच FHD Plus मुख्य डिस्प्ले मिळेल. Android 13 सह ColorOS १३.२ आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये ५०MP वाइड अँगल कॅमेरा, ४८MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि ४८MP पोर्ट्रेट कॅमेरा मिळणार आहे. तुम्हाला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२MP कॅमेरा मिळेल. Oppo Find N3 Flip मध्ये, तुम्हाला ४४ Watt फास्ट चार्जिंगसह ४३०० mAh बॅटरी मिळेल.

White onion from Alibaug enters in market
अलिबागचा पांढरा कांदा बाजारात दाखल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
News About Honda
Honda : होंडा भारतात सुरु करणार इलेक्ट्रिक बाइकची फॅक्टरी, काय असणार खासियत?
Alphonso Mangoes arrived in APMC market Navi Mumbai
एपीएमसीत हापूस दाखल
Ola, Uber govt notices
Ola, Uber Govt Notices : iPhone वापरता की अँड्रॉइड याचा कॅबच्या भाड्यावर फरक पडतो? केंद्राच्या नोटीशीनंतर ओला, उबरने दिलं उत्तर
IMEI Number for mobile phone
चोरी गेलेला मोबाईल पुन्हा मिळवण्यासाठी IMEI नंबर आहे महत्त्वाचा, कसा मिळवाल ‘हा’ क्रमांक? जाणून घ्या
Republic Day Sale Realme GT 6 Get massive discount
Republic Day Sale : रिअलमीच्या ‘या’ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; मिळवा सात हजारांपर्यंतची सवलत

हेही वाचा : बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Oppo चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन देशात दाखल, पहिल्या सेलमध्ये ‘इतक्या’ रुपयांची सूट

किंमत

ओप्पोच्या नवीन फोल्डेबल स्मार्टफोनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९४,९९९ रुपये आहे. मात्र खरेदीदारांना आयसीआयसीआय, एसबीआय, कोटक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या कार्डने व्यवहार केल्यास १२ हजारांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. तुम्ही स्लीक ब्लॅक आणि क्रीम गोल्ड कलरमध्ये फोन खरेदी करू शकता. ओप्पो ग्राहकांना Find N3 Flip स्मार्टफोन खरेदी करताना आपला जुना ओप्पो कंपनीचा फोन एक्सचेंज करण्याची ऑफर मिळणार आहे. ओप्पो ग्राहकांना ८ हजारांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळू शकते. याबाबतचे वृत्त zeenews ने दिले आहे.

Story img Loader