ओप्पो आणि सॅमसंग या दोन लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपन्या आहेत. सध्या अनेक कंपन्यानी आपले फोल्डेबल स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत . तर येत्या काही दिवसांमध्ये काही कंपन्यापला फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. ओप्पो कंपनीने नुकताच आपला Find N3 फ्लिप हा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोल्डेबल स्मार्टफोन सॅमसंगच्या Galaxy Z Flip 5 शी स्पर्धा करणार आहे. सध्या भारतीय बाजारपेठांमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च होण्याचे प्रमाण हळू हळू वाढताना दिसून येत आहे. जर का तुम्ही एखादा प्रिमियम फ्लिप फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर ओप्पो Find N3 आणि सॅमसंग Galaxy Z Flip 5 या फोनचा विचार करू शकता. आज आपण दोन्ही फोन्समधील तुलना जाणून घेणार आहोत.
ओप्पो Find N3 Flip Vs सॅमसंग गॅलॅक्सी Z Flip : डिझाइन
ओप्पो आणि सॅमसंगच्या फोल्डबेल फोनचे डिझाइन पूर्णपणे वेगळे आहे. गॅलॅक्सी झेड फ्लिप ५ मध्ये वापरकर्त्यांना एक मोठा कव्हर डिस्प्ले मिळतो. तर ओप्पो फाइन्ड एन ३ फ्लिपवर व्हर्टिकल कव्हर डिस्प्ले मिळतो. IPX8 रेटिंगसह झेड फ्लिप ५ फोन ओप्पोच्या फोनपेक्षा अधिक मजबूत फ्लिप स्मार्टफोन आहे. ओप्पोच्या फोनमध्ये अलर्ट स्लायडर नावाचे फिचर मिळते. याबाबतचे वृत्त The Indian Express ने दिले आहे.
हेही वाचा : सॅमसंगने लॉन्च केला ‘हा’ फोन, काय आहेत फीचर्स
ओप्पो Find N3 Flip Vs सॅमसंग गॅलॅक्सी Z Flip : डिस्प्ले आणि कॅमेरा
ओप्पो फाइन्ड एन ३ फ्लिप फोल्डेबल फोनमध्ये ६.८ इंचाचा थोडा मोठा डिस्प्ले येतो. तर सॅमसंग गॅलॅक्सी झेड फ्लिप ५ मध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळतो. दोन्ही डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. ओप्पो फाइन्ड एन ३ फ्लिप फोल्डेबल फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि ४८MP पोर्ट्रेट कॅमेरा आहे. तुम्हाला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२MP कॅमेरा मिळेल. तर सॅमसंग गॅलॅक्सी झेड फ्लिप ५ मध्ये १२ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी १० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.
ओप्पो Find N3 Flip Vs सॅमसंग गॅलॅक्सी Z Flip : परफॉर्मन्स आणि बॅटरी, किंमत
ओप्पोच्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये मिडियाटेक डायमेन्शन ९२०० प्रोसेरचा सपोर्ट देण्यात आला आहे. तर सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपचा सपोर्ट देण्यात आला आहे. सॅमसंग झेड फ्लिप ५ अँड्रॉइड १३ सह OneUI 5 वर तर ओप्पोचा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित ColorOS 13 वर चालतो. दोन्ही फोन्सना चार वर्षाचे OS अपडेट आणि पाच वर्षांचे सेफ्टी अपडेट्स दिले जाणार आहेत. ओप्पोच्या Find N3 Flip मध्ये ४,३०० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ४४ W चा चार्जिंग सपोर्ट देखील या फोनमध्ये वापरकर्त्यांना मिळणार आहे. तर सॅमसंगच्या गॅलॅक्सी झेड फ्लिप ५ मध्ये ३,७०० mAh क्षमतेची बॅटरी आणि ४४ W चा चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. ओप्पोच्या फोनमध्ये जास्त क्षमतेची बॅटरी देण्यात अली आहे.ओप्पो Find N3 या फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत ९४,९९९ रुपये आहे. तर सॅमसंग गॅलॅक्सी Z Flip 5 मपग कगलसू ९९,९९९ रुपये आहे.
ओप्पो Find N3 Flip मध्ये जास्त क्षमतेची बॅटरी, चांगला कॅमेरा सेटअप आणि कमी किंमत असे काही चांगल्या गोष्टी दिसून येतात. तसेच गॅलॅक्सी Z Flip 5 मध्ये एक चांगले सॉफ्टवेअर, प्रिमियम बिल्ड अशा काही गोष्टी देण्यात आल्या आहेत. जर का तुम्ही चांगला कॅमेरा असणारा फोन शोधत असाल तर ओप्पोच्या Find N3 Flip चा विचार करू शकता. तसेच चांगल्या परफॉर्मन्ससाठी तुम्ही सॅमसंगच्या Z Flip 5 चा विचार करू शकता.