Oppo चा शानदार स्मार्टफोन Oppo K10 भारतात लॉन्च झाला आहे. कंपनीच्या के सीरीजची ही अपग्रेडेड व्हर्जन आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. 33W फास्ट चार्जिंगसोबतच या फोनमध्ये 5000mAh बॅटरी पॅक दिला जात आहे. चला जाणून घेऊया, कोणती खास फिचर्स आहेत आणि कंपनीकडून कोणत्या गोष्टी ऑफर केल्या जात आहेत?
हा फोन दोन व्हेरिएंट 6GB + 128GB आणि 8GB + 128GB मध्ये सादर करण्यात आला आहे. ज्याची किंमत अनुक्रमे १४,९९० आणि १६,९९० रुपये आहे. यात दोन कलर ऑप्शन्स आहेत. ब्लॅक कार्बन आणि ब्लू फ्लेम असे दोन कलर या स्मार्टफोनसाठी ठेवण्यात आले आहेत. हा फोन फ्लिपकार्ट आणि ओप्पोच्या ऑनलाइन स्टोअरवरून २९ मार्चपासून खरेदी करता येईल. या फोनवर SBI कार्ड वापरल्यास २००० रुपयांची सूट मिळेल. तसंच, बडोदा बँक आणि स्टँडर्ड बँकेचे ग्राहक देखील १००० रूपयांची सूट घेऊ शकतात.
हा फोन टक्कर देईल
किंमतीच्या आधारावर तुलना केल्यास, हा फोन Realme 9 5G शी तगडी स्पर्धा करतो, ज्याची किंमत १४,९९० रुपये आहे. Realme 9 5G MitiTek प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी पॅक करते.
आणखी वाचा : Vivo नोट सीरीजमध्ये भेटीला येतोय नवा स्मार्टफोन, ७ इंचाची कर्व्ड डिस्प्ले आणि 50MP कॅमेरा
स्पेसिफिकेशन
या फोनमध्ये 1080×2412 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.59 इंच FHD+ डिस्प्ले आहे. जे 90Hz रिफ्रेश रेट देते. हे ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटवर आधारित आहे. त्याचे 128 GB स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. यासोबतच यामध्ये 5GB पर्यंत व्हर्चुअल एक्सपेन्सिव्ह रॅम देखील देण्यात आली आहे.
कॅमेरा
Oppo K10 स्मार्टफोन Android 11 वर ColorOS 11.1 वर चालतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/1.8 अपर्चर सह 50MP चा मेन सेंसर देण्यात आला आहे. यासोबतच f/2.4 अपर्चरसह 2MP मायक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. तर त्याचा फ्रंट कॅमेरा 16MP f/2.0 अपर्चर सह येतो.
आणखी वाचा : Poco X4 Pro 5G स्मार्टफोन लॉन्चिंग डेट जाहीर, जाणून घ्या फिचर्स
बॅटरी
याशिवाय या फोनमध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेंसर आणि IP54 रेटिंग देण्यात आली आहे. यासोबतच हा फोन 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरीसह येतो.