Oppo launched Oppo F29 and F29 Pro In India : ओप्पोने नवीन एफ२९ सीरिजचा भाग म्हणून भारतात त्यांचे नवीन 5G स्मार्टफोन, ओप्पो एफ२९ प्रो आणि एफ२९ (Oppo F29 Pro and F29) लाँच केले आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये एआय लिंकबूस्ट टेक्नॉलॉजी आणि हंटर अँटेना आर्किटेक्चरद्वारे ॲडव्हान्स सिग्नल बूस्टर फीचर्स असणार आहेत. तसेच यामध्ये ३६० डिग्री आर्मर बॉडी आणि त्यांना मिलिटरी ग्रेड MIL-STD-810H-2022 सर्टिफिकेशन देण्यात आले आहे, ज्यामुळे ते कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी दोन्ही स्मार्टफोन तयार आहेत. याव्यतिरिक्त, IP66, IP68 आणि IP69 रेटिंगसह हे स्मार्टफोन धूळ आणि पाण्यापासून फोनचे संरक्षण करतील. ओप्पो एफ२९ आणि एफ२९ प्रो बद्दल अधिक माहिती पुढीलप्रमाणे…

किंमत

ओप्पो एफ २९ ५ जीच्या ८ जीबी प्लस १२८ जीबी मॉडेलची किंमत २३ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते आणि ८ जीबी प्लस २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २५ हजार रुपये आहे. सध्या ओप्पोच्या इंडिया ई-स्टोअरवर दोन्ही स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर सुरू आहेत, ज्याची डिलिव्हरी २७ मार्चपासून सुरू होणार आहे. ग्राहक ग्लेशियर ब्लू आणि सॉलिड पर्पल रंग पर्यायांमधून निवडू शकतात.

दुसरीकडे ओप्पो एफ २९ प्रो ५ जीची किंमत ८ जीबी आणि १२८ जीबी कॉन्फिगरेशनसाठी २७ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. २५६ जीबी पर्यायांची किंमत ८ जीबी व्हेरिएंटसाठी २९ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी व्हेरिएंटसाठी ३१ हजार ९९९ रुपये आहे. या मॉडेलसाठी प्री-ऑर्डरदेखील सुरू आहेत, ज्याची डिलिव्हरी १ एप्रिलपासून सुरू होईल. हा स्मार्टफोन ग्रॅनाइट ब्लॅक आणि मार्बल व्हाइट रंगात उपलब्ध आहे.

जर ग्राहक एसबीआय, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा किंवा आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड वापरत असतील तर त्यांना १० टक्केपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक, अतिरिक्त १० टक्के एक्स्चेंज बोनसदेखील उपलब्ध आहे. खरेदीदार आठ महिन्यांपर्यंत शून्य डाउन पेमेंट योजना किंवा सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्याय निवडू शकतात.

दोन्ही मॉडेल्स अधिकृत वेबसाइटवर तसेच Amazon आणि Flipkart वरदेखील खरेदीसाठी उपलब्ध असतील.

ओप्पो एफ २९ ५ जी आणि एफ २९ प्रो ५ जी मध्ये ६.७ इंच फुल-एचडी+ (1,080 x 2,412 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहेत, ज्यांचा रिफ्रेश रेट 120Hz, टच सॅम्पलिंग रेट 240Hz पर्यंत आणि कमाल ब्राइटनेस लेव्हल १,२०० निट्स आहे, हे सर्व कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस दोनद्वारे संरक्षित आहे. F29 सीरिजमध्ये अतिरिक्त टिकाऊपणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i सुद्धा देण्यात आला आहे. Oppo F29 5G चा बेस मॉडेल स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 चिपसेटवर चालतो, तर F29 Pro मध्ये MediaTek Dimensity 7300 Energy एसओएस आहे. दोन्ही स्मार्टफोन १२ जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आणि २५६ जीबीपर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतात, जे ColorOS 15.0 सह Android 15 वर चालतात.

फोटोग्राफीसाठी दोन्ही मॉडेल्समध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सेलचा दुय्यम सेन्सर आणि १६ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. प्रो व्हेरिएंटचा में कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) देतो, तर स्टॅंडर्ड व्हर्जनमध्ये इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायझेशन (EIS) समाविष्ट आहे. दोन्ही फोन ३०fps वर ४K व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात आणि अंडरवॉटर फोटोग्राफी मोडसह येतो.

आयपी६६, आयपी६८ आणि आयपी स्टँडर्ड्स ओप्पो एफ२९ ५जी सीरिजचे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करते. स्मार्टफोनची ३६० डिग्री आर्मर बॉडीसह मिलिटरी-ग्रेड एमआयएल-एसटीडी-८१०एच-२०२२ ड्रॉप रेझिस्टन्ससह तयार केली आहे. एन्हान्स सिग्नल स्ट्रेंथसाठी ते एआय लिंकबूस्ट तंत्रज्ञान आणि हंटर अँटेना आर्किटेक्चरचा वापर करतात.

ओप्पो एफ २९ ५ जी मध्ये 6,500mAh बॅटरी आहे, जी 45W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते; तर F29 Pro मध्ये 80W SuperVOOC चार्जिंग क्षमता असलेली 6,000mAh बॅटरी आहे. सुरक्षेसाठी दोन्ही डिव्हाइस इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतात. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ५ जी, ४ जी, वायफाय ६, ब्लूटूथ, ओटीजी, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी समाविष्ट आहेत.