ओप्पोने भारतात एक नवीन मिड-रेंज स्मार्टफोन लाँच केला आहे. ओप्पोचा हा फोन ए सिरीजचा आहे. ओप्पोचा लेटेस्ट ओप्पो ए ५७ स्मार्टफोन कंपनीने भारतात मीडियाटेकचा प्रोसेसर आणि ४जीबी रॅमसह सादर केला आहे. यासोबतच या फोनमध्ये एचडीप्लस रिझोल्यूशनचा मोठा डिस्प्ले आहे, ज्यामध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच देण्यात आला आहे. ओप्पोच्या नवीन स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात ५००० एमएएच बॅटरी, सुपर वीओओसी चार्जिंग, आयपीएक्स ४ रेटिंग आणि फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. तर जाणून घेऊया ओप्पो ए ५७ स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि उपलब्धतेबद्दल माहिती.
ओप्पो ए ५७ (Oppo A57) किंमत
ओप्पो ए ५७ स्मार्टफोन एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ४जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेजसह १३,९९९ रुपये किमतीत सादर करण्यात आला आहे. ओप्पोचा हा फोन ओप्पो स्टोरवरून खरेदी करता येईल.
ओप्पो ए ५७ चे तपशील आणि वैशिष्ट्ये
ओप्पोच्या ए सिरीजचा नवीनतम स्मार्टफोन, १६१२×७२० पिक्सेलच्या रिझोल्यूशनसह ६.५६ इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले, २६९ पीपीआयची पिक्सेल घनता आणि ६००निट्सच्या ब्राइटनेससह सादर केला गेला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश दर ६० एचझेड आहे आणि टच सॅम्पलिंग दर ६०एचझेड आहे. यासोबतच ओप्पोचा हा फोन पांडा एमएन२२८ ग्लास प्रोटेक्शन सह सादर करण्यात आला आहे. ओप्पो ए ५७ स्मार्टफोन मीडियाटेकच्या ऑक्टो कोअर हेलिओ जी ३५ प्रोसेसर आणि पावरवीआर आयएमजी जीइ८३२० जीपीयू सह सादर करण्यात आला आहे. हा फोन ४जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि ६४ जीबी इ एमएमसी ५.१ स्टोरेजसह सादर केला गेला आहे. ओप्पोचा हा फोन एंड्रॉइडवर आधारित कलरओएस १२.१ वर चालतो.
ओप्पोचा हा फोन डुअल रियर कॅमेरा सेटअप सह सादर करण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा १३एमपी आहे, ज्यामध्ये २एमपी मोनो कॅमेरा देण्यात आला आहे. या ओप्पो फोनमध्ये ८एमपी फ्रंट कॅमेरा आहे. ओप्पो ए ५७ स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी आणि ३३ डब्लू सुपर वीओओसी फास्ट चार्जिंग आहे. हा स्मार्टफोन ग्लोव्हिंग ग्रीन आणि ग्लोव्हिंग ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा आकार १६३.७४×७५.०३×७.९ मिमी आणि वजन १८७ ग्रॅम आहे. या फोनमध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट, साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट आणि ३.५ मिमी ऑडिओ जॅक आहे. तसंच हा स्मार्टफोन आयपीएक्स ४ आणि आयपीएक्स ५ रेटिंगसह येतो.