भारतामध्ये आज Oppo आपली Reno 10 सिरीज लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी देशामध्ये तीन मॉडेल्सची घोषणा करेल, ज्यामध्ये विक्रीचे प्रमुख आकर्षण हे रिअर कॅमेरा सेटअप असतील. लॉन्चिंग इव्हेंट आज दुपारी १२ वाजता सुरु होणार आहे. लोकं हा इव्हेंट Oppo च्या अधिकृत YouTube चॅनेलद्वारे थेट पाहू शकणार आहेत. इव्हेंटच्या आधी कंपनीने नवीन ५जी फोनच्या काही फीचर्सबद्दल सांगितले आहे. तर फीचर्स, अपेक्षित किंमत आणि इतर गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

अपेक्षित फीचर्स

नवीन ओप्पो रेनो १० या सिरीजमध्ये टेलीफोटो रिअर कॅमेरा हे या मॉडेल्समधील प्रमुख आकर्षण असेल. Oppo ने पुष्टी केली की Oppo Reno 10 Pro+ मध्ये पेरिस्कोप लेन्स असेल जे 3x ऑप्टिकल इतके झूम करू शकेल. Reno Pro+ मध्ये पेरिस्कोप मॉड्यूलसह ​​स्लिम डिझाइन दिले जाऊ शकते. जे इतर डिव्हाइसपेक्षा ०.९६ मिमी इतके स्लिम आहे. Reno 10 Pro आणि Pro+ या दोन्ही मॉडेल्समध्ये सामान रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात ६४ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा असेल. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा

हेही वाचा : आता बातम्या सांगणार AI न्युज अँकर! ओडीसाच्या खासगी चॅनलने लॉन्च केली व्हर्च्युअल अँकर ‘लिसा’; पाहा व्हिडीओ

या शिवाय कॅमेरा सेटअपमध्ये ११२ डिग्री फिल्ड ऑफ व्ह्यूसह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा देखील देण्यात येणार आहे. तसेच ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा हा ऑल पिक्सेल र्व दिशात्मक फोकससाठी मोठ्या सेन्सर आकारासह देण्यात येईल. Reno 10 Pro+ मध्ये Qualcomm चा Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. Oppo Reno 10 स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7050 चिपसेट हूड अंतर्गत आहे. तर प्रो मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 778G SoC असू शकतो.

ओप्पो रेनो १० सिरीजमधील प्रो आणि प्रो + मॉडेलमध्ये अनुक्रमे १०० W फ्लॅश चार्जसह ४,६०० mAh क्षमतेची बॅटरी ऑफर केली जाऊ शकते. रेजिलर व्हर्जन हे ६७W फास्ट चार्जिंगसह ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळू शकते. Flipkart वरील टीझर्स सूचित करतात की Oppo Reno 10 सिरीजमध्ये कर्व्ह डिस्प्ले, पंच होल डिझाईन आणि स्लिम प्रोफाइल असे फीचर्स मिळू शकतात.

हेही वाचा : कॉमेडियन,लेखिका सारा सिल्व्हरमॅन यांनी OpenAI आणि Meta वर दाखल केला खटला, नेमके प्रकरण काय ?

Oppo Reno 10: लीक झालेली किंमत

ओप्पो रेनो १० प्रो + ची किंमत ५९,९९९ रुपये असू शकते. या मॉडेलचे स्टोरेज आणि रॅम किती असेल हे अद्याप उघड झालेलं नाही. तर ओप्पो रेनो १० प्रो ची किंमत ४४,९९९ रुपये असू शकते. तसेच ओप्पो रेनोच्या बेस व्हेरिएंटची किंमत ३८,९९९ रुपये असू शकते. अधिकृत किंमती सिरीज लॉन्च झाल्यानंतरच कळू शकतील.

Story img Loader