Oppo Reno 7 5G स्मार्टफोनची आज पासून प्री-बुकिंग ही दुपारी १२ वाजता भारतात सुरू झाली आहे. दरम्यान हा स्मार्टफोन ओप्पो इंडिया आणि फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच ओप्पो रेनो ७ ५जी (oppo Reno 7 5G) हा फोन Oppo Reno 7 Pro 5G स्मार्टफोनसोबत या महिन्यात लॉन्च करण्यात आला आहे.
Oppo Reno 7 5G ची भारतातील किंमत, प्री-ऑर्डर तपशील
Oppo Reno 7 5G या स्मार्टफोनची भारतात किंमत २८,९९९ रुपये आहे, ज्यामध्ये फोनचा ८जिबी रॅम + २५६ जिबी स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे. कंपनीच्या वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर आज दुपारी १२ वाजल्यापासून या फोनची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. ग्राहकांकरिता हा फोन १७ फेब्रुवारीपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. फोनमध्ये स्टारलाईट ब्लॅक आणि स्टारलाईट ब्लू कलर असे पर्याय उपलब्ध आहेत.
ओप्पो आणि फ्लिपकार्ट या वेबसाइटवर Oppo Enco M32 earphones स्मार्टफोनसोबत १,३९९ रुपयांमध्ये उपलब्ध करत आहेत, ज्याची मूळ किंमत १,७९९ रुपये इतकी आहे. याशिवाय, ४,३८४ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह या स्मार्टफोनवर नो-कॉस्ट ईएमआय उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच स्टँडर्ड चार्टर्ड आणि बँक ऑफ बडोदा कार्ड वापरण्यावर फोनवर ३,००० रुपयांपर्यंत त्वरित सूट देखील मिळत आहे. त्याचवेळी, ३,००० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे.
ओप्पो रेनो ७ ५जी स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये
ड्युअल सिम (नॅनो) Oppo Reno 7 5G फोन Android ११ आधारित ColorOS १२ वर चालतो. फोनमध्ये ९०Hz रिफ्रेश रेट आणि १८०Hz टच सॅम्पलिंग रेटसह ६.४-इंच फुल एचडी+ (१०८०x२४०० पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे. फोनच्या डिस्प्लेसोबतच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन देखील देण्यात आला आहे. याशिवाय हा फोन MediaTek Dimensity ९०० प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये ८ जिबी रॅम आणि २५६ जिबी स्टोरेज देण्यात आले आहे. Oppo Reno 7 5G फोन फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ज्यात प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सेल आहे, त्यात ८ मेगापिक्सेल वाइड-एंगल सेन्सर आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर समाविष्ट करणाया आले आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सांगायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, NFC, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट समाविष्ट आहे. सेन्सर्समध्ये एक्सीलरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, जायरोस्कोप, पेडोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश केला गेला आहे. याशिवाय, फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. तसेच या फोनला ६५W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४,५००mAh ड्युअल-सेल बॅटरीचा पाठिंबा आहे. फोनचे डायमेंशन १६०.६ x७३.२ x७.८mm आणि वजन १७३ ग्रॅम आहे.