मोबाईल निर्माता कंपनी Oppo लवकरच भारतात आपले तीन नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. कंपनी OPPO A17, OPPO A17K आणि OPPO A77S नावाचे तीन स्मार्टफोन सादर करेल. कंपनी दसऱ्याच्या निमित्ताने हे नवीन फोन लाँच करणार असल्याची माहिती आहे. जाणून घेऊया या फोनविषयी अधिक माहिती.

  • OPPO A17K चे स्पेसिफिकेशन

OPPO A17K चे स्पेसिफिकेशन पाहता या फोनमध्ये ६.५६ इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. हा फोन खूप स्लिम आहे आणि याची जाडी फक्त ८.२९mm असेल आणि वजन फक्त १८९ ग्राम. असेल. मिळालेल्या माहितीनुसार फोन अँड्रॉइड १२ वर लाँच केला जाईल जो कलर ओएस १२.१ आधारित असेल. कंपनी हा फोन ८ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करू शकते.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Pune will soon be known as an electronic cluster says Ashwini Vaishnav
पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?
Samsung Galaxy S25 Series Launch In India
Samsung Galaxy S25 : सॅमसंगचा पॉवरफूल स्मार्टफोन होणार ‘या’ तारखेला लाँच! कशी करायची प्री-बुकिंग? जाणून घ्या…
  • OPPO A17 चे स्पेसिफिकेशन

OPPO A17 चे स्पेसिफिकेशन पाहता, फोन देखील A17K सारखा आहे फक्त कॅमेरा वेगळा आहे. यात कंपनीनं ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे आणि मेन कॅमेरा एफ/१.८ अपर्चरसह येतो, जो ५० मेगापिक्सलचा आहे. तर सेकंडरी कॅमेरा २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये एफ/२.२ अपर्चर असलेला ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात

OPPO A17 स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ७२० x १६०० पिक्सल रेजोल्यूशनसह ६.५६ इंचाची स्क्रीन मिळेल. तसेच पावर बॅकअपसाठी यात ५,०००mAh ची बॅटरी आहे जी १०W फास्ट चार्जिंगसह येते.

आणखी वाचा : ‘Jio Phone 5G’ : किंमत झाली लीक; आणखी जाणून घ्या बरंच काही…  

आणखी वाचा

  • OPPO A77S चे स्पेसिफिकेशन

OPPO A77S पाहता हा फोन थोडा महाग आहे परंतु त्यानुसार स्पेसिफिकेशन देखील आहेत. फोनमध्ये ६.६ इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे जो ९०hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात मेन कॅमेरा ५०MP चा आहे तर सेकंडरी कॅमेरा २MP चा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी ८MP चा फ्रंट कॅमेरा HDR सपोर्टसह मिळेल. यात कंपनीनं क्वॉलकॉमची मदत घेतली आहे. हा फोन Qualcomm Snapdragon ६८० प्रोसेसरवर चालतो जो ६nm फॅब्रिकेशन बेस्ड आहे. तसेच फोनमध्ये ८ जीबी RAM आहे जो RAM प्लसच्या मदतीनं वाढवता येईल. त्याचबरोबर १२८ जीबी ची मेमरी मिळेल.

पावर बॅकअप पाहता फोनमध्ये तुम्हाला ५,०००mAh ची बॅटरी ३३W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल. सर्व फीचर्स चांगले आहेत परंतु यात 5G सपोर्ट नाही ही एक कमतरता वाटते, हा एक 4G फोन आहे.

OPPO A17, OPPO A17K आणि OPPO A77S ची किंमत

OPPO A17K यातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल जो १०,४९९ रुपयांमध्ये लाँच होईल. त्यानंतर OPPO A17 या फोनची किंमत १२,४९९ रुपये असेल. तसेच OPPO A77S ची किंमत या फोन्समध्ये सर्वात जास्त असेल आणि हा स्मार्टफोन १७,९९९ रुपयांमध्ये बाजारामध्ये लाँच होईल.

 

 

Story img Loader