Oppo unveil foldable smartphones : सध्या भारतीय बाजारपेठेत सॅमसंगचे अनेक फ्लिप फोन उपलब्ध आहेत. अनोख्या डिजाईनमुळे हे फीचर सध्या चर्चेत आहे. हे फीचर अ‍ॅपलकडे नाही, याचा फायदा घेत सॅमसंगने आपल्या जाहिरातीतून अ‍ॅपलला ट्रोल देखील केले आहे. त्यानंतर या फीचरची चर्चा इंटरनेटवर चांगलीच रंगली आहे. मात्र, सॅमसंगला आता फ्लिप तंत्रज्ञानात जोरदार टक्कर देण्यासाठी ओप्पोने आपले दोन नवीन फोल्डेबल फोन सादर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओप्पोने Find N2 आणि Find N2 Flip हे दोन स्मार्टफोन चीनमध्ये सादर केले आहेत. Find N2 स्मार्टफोनला टॅबलेट स्टाइल डिजाईन आहे, तर Find N2 Flip स्मार्टफोनचे डिजाईन सॅमसंग गॅलक्सी झेड फ्लिप फोन प्रमाणे आहे.

(ट्विटरला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांची भिती वाटतंय? भारतातील ‘या’ प्रतिस्पर्ध्याला निलंबित केल्यानंतर चर्चेला उधान)

फीचर

पेपरवर देण्यात आलेल्या स्पेसिफिकेशन्सनुसार, Oppo Find N2 Flip स्मार्टफोनमध्ये भव्य बाह्य डिस्प्ले, मोठी बॅटरी, फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान, उच्च रेझोल्युशनचा कॅमेरा आणि इतर फीचर्स देण्यात आले आहेत. फोनचा बाहेरील डिस्प्ले ३.२६ इंचचा आहे, जो सॅमसंगच्या १.९ इंच बाहेरील पॅनलच्या तुलनेने मोठा आहे. डिस्प्ले हवामानाविषयी माहिती आणि सूचनेसह कॅमेऱ्यासाठी व्ह्यू फाइंडर म्हणून वापरता येऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे.

फोनच्या आतील भागात ६.८ इंच स्क्रीन देण्यात आली आहे. युजरने फोन दिवसातून शंभर वेळा फोल्ड आणि अनफोल्ड केल्यास स्मार्टफोनचे फोल्डेबल तंत्रज्ञान १० वर्षांपर्यंत टिकू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. फोनच्या बॉडीला ग्लॉसी फिनिश मिळाले असून सॅमसंगच्या अलीकडेच लाँच झालेल्या फ्लिप फोनच्या तुलनेत त्यात फोल्ड झाल्यावर पडलेली लाइन फार कमी दिसून येते. फोनमध्ये मीडियाटेक डायमेनसिटी ९००० प्लस प्रोसेसर, ४३०० एमएएच बॅटरी, ४४ वॉट फास्ट चार्जर, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळते.

(Flipkart Big Saving Days sale: स्मार्ट टीव्हींवर ४० टक्क्यांपर्यंत सूट, Samsung, Lg टीव्ही बचतीसह खरेदी करा, पाहा Best deals)

Oppo Find N2 हा दुसऱ्या पीढीच्या फोल्डेबल फोन असून तो हलका असल्याचे म्हटल्या जाते. या फोनमध्ये विस्तीर्ण डिस्प्ले मिळतो. अनफोल्ड केल्यावर त्यास टॅबलेटसारखे वापरता येते. फोनमध्ये ७.१ इंच इंटरनल डिस्प्ले, ५.५४ इंच एक्सटरनल डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८+ जेन वन प्रोसेसर, ४५२० एमएएच बॅटरी, ६७ वॉट फास्ट चार्जिंग, ३२ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह ५० मेगापिक्सेल कॅमेरा मिळत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppo unveil find n2 and find n2 flip foldable smartphone in china ssb
Show comments