पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. जेव्हा कोणीही पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कायदेशीर मागणीला (Legal Demand) प्रतिसाद मिळाल्यानंतर पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे असे उत्तर मिळते. कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून @GovtofPakistan चे अकाऊंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे.

हेही वाचा : Google ची एक चूक अन् भरावा लागणार १,३३८ कोटींचा दंड; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट ब्लॉक

ट्विटरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मायक्रोब्लॉगिंग साईट न्यायालयाच्या आदेशासारख्या वैध कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून अशी कारवाई करत असते. सध्या, पाकिस्तान सरकारचे ट्विटर फीड ‘@Govtof Pakistan’ भारतीय वापरकर्त्यांना दिसत नाही. जर तुम्ही @Govtof Pakistan असे ओपन करून बघत असाल तर तुम्हाला @GovtofPakistan’s account has been withheld in India in response to a legal demand असा मेसेज दिसतो.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात बनावट आणि भारताविरोधी कंटेंटसाठी ८ युट्यूबवर आधारित न्यूज चॅनेल ब्लॉक केले होते. जे पाकिस्तानमधून ऑपरेट केले जात होते त्यामध्ये १ फेसबुक अकाउंट होते. याशिवाय गेल्या वर्षी जून महिन्यात ट्विटरने भारतातील संयुक्त राष्ट्रांच्या पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकृत अकाउंट्सवर बंदी घातली होती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, माहिती २०२१ अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून ही कारवाई करण्यात आली आहे.

Story img Loader