पॅन आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. तुम्ही अद्याप तुमचा पॅन आणि आधार लिंक केले नसेल, तर आयकर विभाग तुमचे पॅन कार्ड रद्द करू शकते. यासोबतच दंडही होऊ शकतो. अशा परिस्थितीत आधार आणि पॅन कार्ड लिंकिंग लवकरात लवकर व्हायला हवे. आधार आणि पॅनमधील माहिती जुळत नसल्यामुळे अनेकांना लिंक करण्यात अडचणी येत आहेत. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही.

आधार-पॅनचे फायदे

आधार कार्डच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो. वन नेशन वन रेशन कार्ड असो की पीएम किसान सन्मान निधी किंवा अंत्योदय अन्न योजना, या सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत फक्त आधार कार्डद्वारेच पोहोचला आहे. त्याचबरोबर बँक, पेन्शन, रेल्वेसह अन्य सरकारी खात्यांमध्येही आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जात आहे.

e adhar card
ई-आधार कार्ड म्हणजे काय? सामान्य आधार कार्ड आणि ई-आधार कार्डमध्ये फरक काय?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sanjay Shirsat On Guardian Minister Post
Sanjay Shirsat : खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्री पदावरुन महायुतीत रस्सीखेच? शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्याचा मोठा दावा
Supreme Court decision regarding credit card payments print eco news
क्रेडिट कार्ड देयकाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; थकबाकीचा भरणा उशिराने केल्यास वार्षिक ३० टक्के व्याजदराची मर्यादा रद्दबातल
Thane District Towing Van, Towing Van issue,
ठाणे जिल्ह्यातील टोईंग व्हॅन बंद, शहरांमध्ये रस्तोरस्ती उभ्या केलेल्या वाहनांचा अडथळा
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
devendra fadnavis raigad
रायगड आणि शिवनेरीवर आता भगवा ध्वज….खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सभागृहात….
Manoj Jarange Chhagan Bhujbal
Manoj Jarange : “…मग फडणवीस त्यांना तुरूंगात फेकून देणार”, मनोज जरांगे यांचा भुजबळांबाबत मोठा दावा

दुसरीकडे, पॅन कार्ड मोठे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आणि आयकर रिटर्न भरण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर बँकेकडून कर्ज घेण्यात पॅनकार्डचाही मोठा वाटा आहे. अशा स्थितीत ही दोन्ही कागदपत्रे अनेकदा रोजच्या कामात वापरली जातात.

ही माहिती जुळली पाहिजे

युनि आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नुसार, आधार कार्ड जारी करणारी संस्था, त्यात दिलेली माहिती जसे की जन्मतारीख, लिंग, नाव, वडील/पतीचे नाव पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी जुळले पाहिजे. यापैकी कोणतीही माहिती जुळत नसल्यास, तुमचा आधार आणि पॅन लिंक होणार नाही. तुमच्यासोबतही अशीच समस्या असेल, तर त्यासाठी तुम्हाला आधार किंवा पॅन कार्डपैकी एकामध्ये दिलेली चुकीची माहिती दुरुस्त करावी लागेल.

चूक सुधारण्यासाठी हे काम करा

पॅन किंवा आधारमध्ये काही चूक असल्यास ती दुरुस्त केली जाऊ शकते. पॅन कार्डमधील चूक सुधारण्यासाठी तुम्हाला onlineservices.nsdl या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. दुसरीकडे, आधार कार्डमधील चूक सुधारण्यासाठी, तुम्हाला UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

Story img Loader