एलॉन मस्क यांच्याविरोधात पराग अग्रवाल यांच्यासह ट्विटरच्या माजी तीन प्रमुख अधिकाऱ्यांनी खटला दाखल केला आहे. या खटल्यामध्ये त्यांच्या पूर्वीच्या नोकरीदरम्यान काँग्रेसमधील खटला, तपास आणि प्रश्नांमुळे झालेल्या खर्चासाठी नुकसानभरपाई मागितली आहे. या खटल्यात माजी सीईओ पराग अग्रवाल आणि कंपनीचे माजी कायदेशीर प्रमुख आणि वित्तीय अधिकारी यांच्याकडून 1 मिलियन डॉलरपेक्षा जास्त रक्कम मागितली आहे आणि ट्विटर कायदेशीररीत्या ही रक्कम देण्यास बांधील असल्याचंही म्हटलं आहे. कोर्ट फायलिंगमध्ये यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) आणि डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (DOJ) यांच्या तपासाशी संबंधित अनेक खर्चांचा उल्लेख आहे, परंतु तपासाचे स्वरूप किंवा तपास चालू आहे की नाही याचा समावेश नाही. याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
अग्रवाल तपास यंत्रणांना सहकार्य करीत आहेत
अग्रवाल आणि मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांनी SEC ला दिलेल्या निवेदनानुसार, ते फेडरल एजन्सींना त्यांच्या तपासात सहकार्य करीत आहेत. एलॉन मस्कने ट्विटर विकत घेताना सर्व नियमांचे पालन केले होते का, याची SEC चौकशी करीत आहे.
हेही वाचाः बँक एफडीपेक्षाही पोस्टातील आता ‘या’ योजनेत मिळणार ७ टक्क्यांच्या जवळपास परतावा
उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोशल मीडिया कंपनी असलेल्या ट्विटरचे ४४ बिलियन डॉलरमध्ये अधिग्रहण केल्यानंतर कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी अग्रवाल, गाडगे आणि सहगल यांना मस्कने बाहेरचा रस्ता दाखवला होता. तसेच कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी एलॉन मस्कने सुमारे ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये केले बरेच बदल
एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घेतल्यापासून अनेक बदल करण्यात आले आहेत. आता ट्विटरने ब्लू टिकचे पैसे वसूल करण्यास सुरुवात केली आहे. कोणीही १४.९९ डॉलर भरून ब्लू टिक मिळवू शकतो.