चांद्रयान ३ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या LVM3 M4 प्रक्षेपण वाहनाचा ‘क्रायोजेनिक अप्पर स्टेज बुधवारी अनियंत्रिपणे पृथ्वीच्या कक्षेत परतला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) याबाबत माहिती दिली. उत्तर प्रशांत महासागरावर संभाव्य प्रभाव बिंदूचा अंदाज लावला गेला आहे. म्हणजेच ही रॉकेट बॉडी प्रशांत महासागरावर उतरेल. परंतु, हे रॉकेट भारतावरून गेलेले नाही, असं इस्रोने निवेदनात म्हटलं आहे.
इस्रोने सांगितले की ही रॉकेट बॉडी LVM-3 M4 प्रक्षेपण वाहनाचा भाग होती. बुधवारी, आंतरराष्ट्रीय वेळेनुसार दुपारी २.२४२ च्या सुमारास ते पृथ्वीच्या कक्षेत परतले. प्रक्षेपणानंतर १२४ दिवसांच्या आत रॉकेट बॉडीने पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा प्रवेश केला.
एक्सिडेंटल एक्सप्लोजनचा धोका कमी करण्यासाठी क्रायोजेनिक अप्पर स्टेजचा वापर केला जातो. १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चं उड्डाण करण्यात आलं. २ वाजून ४८ मिनिटे ३० सेकंदाने चांद्रयान-३ चे प्रक्षेपण तिसऱ्या टप्प्यात पोहोचलं. त्यानंतर क्रायोजेनिक इंजिन सुरू होऊन ते चांद्रयानासोबत पुढे गेलं. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अंतराळात पाठवलेल्या रॉकेट्सना निष्क्रिय करून त्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावली गेली पाहिजे. या नियमानुसारच भारताने हे रॉकेट पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत परतले असल्याचं स्पष्ट केलं आहे.