पेटीएम या भारतातील आघाडीच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स व मोबाइल पेमेंट्सच्‍या अग्रणी कंपनीने भारताच्‍या कानाकोपऱ्यामध्‍ये डिजिटल व्‍यवहार उपलब्‍ध करून देत इन-स्‍टोअर पेमेंट्समधील लीडर म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ केले आहे; तर आता कंपनीने मोठी घोषणा केली आहे आणि एक हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे.

ऑपरेशन्स ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि कर्मचार्‍यांचा खर्च १५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी One 97 Communications ने शेकडो कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे. इकॉनॉमिक टाईम्सनुसार पेटीएममधील विविध विभागांमधील एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीच्या पेमेंट, कर्ज देणे, ऑपरेशन्स आणि विक्री यांसारख्या विभागांवर परिणाम झाला आहे; ज्यामुळे पेटीएमच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी अंदाजे १० टक्के लोकांना नोकऱ्या सोडाव्या लागल्या आहेत.

semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा

हेही वाचा…Vodafone-Idea ने लाँच केला ‘हा’ हटके प्लॅन! दररोज २ जीबी डेटा, Amazon Prime फ्री अन्…

नवीन अर्थव्यवस्था क्षेत्रातील अनेक कंपन्या ज्यामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक व्यवसायांचा समावेश आहे, त्यांनी या वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत २८ हजारांहून अधिक कर्मचारी काढून टाकले आहेत. कारण या कंपन्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेटीएम ही या क्षेत्रातील एक मोठी कंपनीदेखील या ट्रेंडला अनुसरून बदल करत आहे. पेटीएमने आपला खर्च कमी करण्यासाठी आणि आपल्या विविध व्यवसायांची पुनर्रचना करण्यासाठी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील सगळ्यात मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या पेटीएम कंपनीमधून एक हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. पेटीएमची मुख्य कंपनी वन९७ कॉम्युनिकेशनने (One 97 Communications) यावेळी एक हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे आणि पेटीएमच्या विविध युनिट्सचे कर्मचारी नोकऱ्या सोडाव्या लागल्या.पेटीएमने आपला खर्च कमी करण्यासाठी आणि आपल्या विविध व्यवसायांची पुनर्रचना करण्यासाठी ही नोकरकपात केली आहे. पेटीएमच्या या निर्णयामुळे त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांना नोकऱ्या सोडाव्या लागल्या आहेत. भारतीय स्टार्टअपमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी नोकरकपात आहे. २०२३ हे स्टार्टअप कर्मचाऱ्यांसाठी चांगले वर्ष ठरले नाही. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने असुरक्षित कर्जावर नियामक निर्बंध लादले होते, यामुळे त्याचा पेटीएमवरही परिणाम झाला होता.