पेटीएमने ‘बिजली डेज’ची घोषणा केली आहे. या ऑफर्सच्या माध्यमातून पेटीएमवरुन वीज बिल भरल्यास मोठा फायदा होणार आहे. पेटीएमवरुन विजेचं बील भरणाऱ्या युझर्सला १०० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक आणि अतिरिक्त रिवॉर्ड दिले जातील. यासाठी युझर्सला दर महिन्याच्या १० ते १५ तारखेदरम्यान वीज बील भरणं बंधनकारक असणार आहे.
पेटीएम अॅप १०० टक्के कॅशबॅक आणि दोन हजार रुपयांपर्यंतचा फायदा या ऑफर अंतर्गत देणार आहे. मात्र त्यासाठी काही अटी आणि शर्थी आहेत. ५० युझर्सला देणार आहे जे वीज बील पेटीएम अॅपच्या माध्यमातून ‘बिजली डेज’च्या कालावधीमध्ये भरणार आहे. याशिवाय युझर्सला अव्वल शॉपिंग आणि ट्रॅव्हल ब्रॅण्ड्सवर मोठी सवलत देणारे व्हाउचर्सही दिले जाणार आहेत.
पेटीएम अॅपच्या माध्यमातून पहिल्यांदाच वीज बील भरणाऱ्या व्यक्तींना २०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. यासाठी प्रोमो कोड वापरावा लागणार आहे. ‘ELECNEW200’ हा कोड वापरुन या ऑफरचा लाभ घेता येईल.
वीज बिल भरण्यासाठी युझर्सला मल्टीपल पेमेंट ऑप्शन्स म्हणजेच अनेक पर्याय देण्यात आले आहेत. पेटीएम युपीआय, पेटीएम वॉलेट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून वीज बील भरण्याचा पर्याय आहे. पेटीएममध्ये पोस्टपेडचीही सुविधा आहे. या माध्यमातून पैसे नसताना वीज बील भरुन नंतर ते पैसे परत करण्याची सुविधा आहे.
पेटीएमवर बिल कसं भरावं?
> बिल भरण्यासाठी पेटीएम अॅपचं वेबपेज ओपन करावं.
> होमपेजवरील रिचार्जस अॅण्ड बिल पेमेंट्सचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे.
> त्यानंतर इलेक्ट्रीसिटी बिल हा पर्याय निवडावा.
> यानंतर युझर्सला वीज नियमन कंपनी कोणती आहे तो पर्याय निवडावा लागेल.
> या ठिकाणी कस्टमर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच सीए क्रमांक टाकावा. हा क्रमांक वीज बिलावर लिहिलेला असतो.
> सीए क्रमांक टाकल्यानंतर ‘प्रोसिड’ पर्याय निवडावा. पुढल्या पेजवर पेटीएम बिलची रक्कम किती आहे हे दाखवेल.
> बिल भरण्यासाठी कोणता पर्याय वापरायचा आहे ते निवडावं लागेल.
> पेटीएम युपीआय, पेटीएम वॉलेट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून बील भरता येईल.
> बील भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट रिसीप्ट डाऊनलोड करता येईल.