Paytm cashback on booking LPG cylinders : गॅस सिलेंडरचे भाव वाढले आहेत. मात्र तुम्ही पेटीएमच्या माध्यमातून गॅसबुक केल्यास तुमची बचत होऊ शकते. पेटीएम भारतगॅस, इंडेन आणि एचपी गॅसच्या बुकींवर युजर्सना मोठी कॅशबॅक ऑफर देत आहे. पेटीएम पहिल्या गॅस बुकिंगवर १५ रुपयांचा कॅशबॅक आणि पेटीएम वॉलेटद्वारे सिलेंडर बुक केल्यास ५० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देत आहे.
पेटीएमने मंगळवारी एलपीजी सिलेंडर बुक करणाऱ्या नवीन युजर्ससाठी धकमाकेदार कॅशबॅक ऑफरची घोषणा केली. नवीन युजर्स FIRSTGAS कोडचा वापर करून १५ रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकतात. यासह पेटीएम वॉलेटद्वारे बुकींग करताना WALLET50GAS कोड वापरल्यास तुम्ही ५० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता.
(७ हजारांच्या आत मिळवा ‘हा’ ३२ इंच टीव्ही, अमेझॉनवर मिळत आहे मोठी सूट)
पेटीएम यूजर्सना नोंदणीकृत मोबाइल क्रमांक वापरून आणि अतिरिक्त शुल्क आकारून सोयीस्करपणे गॅस बुक करू देत आहे. वापरकर्ते अॅपमधील वैशिष्ट्यांद्वारे त्यांच्या बुकिंगचा मागोवा घेऊ शकतात. पहिल्या बुकिंगनंतर अॅप बुकिंग डिटेल्स सेव्ह करेल. याने युजरला दुसऱ्यांदा सिलेंडर बुकिंगसाठी १७ अंकी एलपीजी आयडी टाकण्याची गरज पडणार नाही. पेटीएमद्वारे एलपीजी गॅस सिलेंडर कसे बुक करायचे? जाणून घ्या.
- पेटीएम अॅप उघडा आणि ‘रिचार्जेस आणि बिल पेमेंट कॅटेगरी’ अंतर्गत ‘बुक गॅस सिलिंडर’वर क्लिक करा.
- आता एलपीजी सिलेंडर सर्व्हिस प्रोव्हाईडर सिलेक्ट करा आणि नंतर मोबाईल क्रमांक, १७ अंकी एलपीजी आयडी आणि ग्राहक क्रमांक टाका.
- आता पेमेंट करून बुकिंग पूर्ण करा. तुमची बुकिंग पुष्टी होईल आणि तुमचा गॅस सिलिंडर तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर २ ते ३ दिवसांत जवळच्या गॅस एजन्सीद्वारे वितरित केला जाईल.