आजकाल डिजिटल पेमेंट करण्याचे प्रमाण देशभरामध्ये वाढले आहे. त्यासाठी आपण अनेक Apps चा वापर करतो. त्यात पेटीएम, गुगल पे , फोन पे आणि अन्य अँपचा समावेश आहे. आता यातील एक असणाऱ्या पेटीएमने एक घोषणा केली आहे. पेमेंट्स आणि वित्तीय सेवा पुरवणाऱ्या पेटीएम या भारताच्या अग्रगण्य ब्रँडची मालक कंपनी असणाऱ्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने ‘पेटीएम फ्रीडम ट्रॅव्हल कार्निव्हलची’ घोषणा केली आहे. तर तर हे कार्निव्हल १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

१ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या पेटीएमच्या कार्निव्हलमध्ये वापरकर्त्यांना स्वात्रंत्र्यदिनाच्या मोठ्या वीकेंडमध्ये पेटीएमच्या माध्यमातून विमान, ट्रेन आणि बसच्या तिकीट बुकिंगवर आकर्षक सवलत मिळणार आहे. पेटीएमकडून RBL बँक आणि ICICI बँकेच्या ऑफर्सच्या माध्यमातून डोमेस्टिक फ्लाईट्सच्या तिकिटांवर फ्लॅट १५ टक्क्यांची तर आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सच्या तिकिटांवर फ्लॅट १० टक्क्यांचा डिस्काउंट दिला जाणार आहे.

ticket inspector caught ticketless passengers, ticketless passengers,
महिला तिकीट तपासनीसाने एकाच दिवसात पकडले १०३ विनातिकीट प्रवासी, वाचा कसे आणि किती दंड वसूल केला
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Violation of traffic rules Mumbai, rickshaw drivers Mumbai,
मुंबई : वाहतुकीचे नियम पायदळी, ५५ रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा
Nashik State Transport Department will run extra bus during diwali
दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा
Diwali Festival Discounts Best time to buy TVS iQube
Diwali Festival Discounts: हीच आहे TVS iQube खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ, आताच करा बुक
hug rule in new zealand airport
मिठी मारा; पण तीन मिनिटंच…. ‘या’ विमानतळानं लागू केला अजब नियम, प्रवाशांनी व्यक्त केला रोष
On the occasion of Pune Diwali the traffic police banned four wheelers in the central area
पुणे: मध्य भागात चारचाकी वाहनांना बंदी
implementation of hawkers policy stalled for ten years
विश्लेषण : मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी दहा वर्षे का रखडली? मुजोर फेरीवाल्यांना ‘राजकीय आशिर्वाद’?

हेही वाचा : मोबाइलपेक्षा स्वस्त असणाऱ्या JioBook वर ‘या’ ठिकाणी मिळतोय मोठा डिस्काउंट, एकदा ऑफर्स पहाच

याशिवाय कंपनीकडून पेटीएम वॉलेट आणि पेटीएम पोस्टपेडच्या माध्यमातून केलेल्या डोमेस्टिक फ्लाईट्सचे बुकिंग केल्यास त्यावर १२ टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. या योजनेत इंडिगो, विस्तारा, स्पाइसजेट, एअरएशिया आकासा एअर आणि एअर इंडिया या सर्व प्रमुख विमानकंपन्यांचा सहभाग असल्याने यूजर्सना तिकिटांच्या बुकिंगवर अधिकाधिक बचत करता येणार आहे. कंपनीद्वारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सशस्त्र दलांमधील कर्मचाऱ्यांनाही विशेष दरात प्रवासभाडे दिले जात आहे. अधिक बचत करण्यासाठी यूजर्स झीरो कन्व्हिनिएन्स शुल्कासह आपले विमानतिकिट बुक करू शकणार आहेत.

बसच्या तिकिटांवर पेटीएमकडून २५ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. यासाठी ‘क्रेझी सेल’ (CRAZYSALE) हा कोड वापरायचा आहे व विशिष्ट ऑपरेटर्सच्या तिकिटांवर २० टक्‍के अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. पेटीएमच्या बेस्ट प्राइम गॅरंटीज योजनेअंतर्गत २,५०० अंतर्गत २,५०० पेक्षा अधिक बस ऑपरेटर्सच्या बस तिकिटांवर सर्वात स्वस्त तिकिटदरांची हमी कंपनी देत आहे. यूपीआय पेमेंटद्वारे केलेल्या ट्रेन तिकिटांच्या बुकिंगवर पेटीएम कडून शून्य शुल्क आकारले जात आहे. पेटीएम अॅपवर यूजर्सना आपल्या बुकिंगचा PNR स्टेटस तपासता येतो, ट्रेन्सचे लाइव्ह ट्रॅकिंग करता येते आणि ट्रेनप्रवासाशी संबंधित सर्व चौकशांसाठी २४X७ ग्राहकसेवा उपलब्ध असते.

हेही वाचा : iPhone 15 ची लॉन्चिंगची तारीख आली समोर, सप्टेंबर महिन्यात ‘या’ दिवसापासून उपलब्ध होणार

तसेच विमान,बस आणि ट्रेनचा तिकीट कोणतेही कारण न देता रद्द करण्याची ‘मोफत कॅन्सलेशन’ची सोयही पेटीएम द्वारे दिली जात आहे, ज्यामुळे तिकिट रद्द करताना कॅन्सलेशनपोटी कोणतेही शुल्क भरावे न लागता तिकिटाची १०० टक्‍के रक्कम वापरकर्त्याच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकणार आहे. पेटीएमद्वारे पेमेंटच्या माध्यमांचे लवचिक पर्याय पुरविले जातात, त्यामुळे यूजर्सना पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, नेटबँकिंग, डेबिट कार्डस् आणि क्रेडिंट कार्डस् यांच्याद्वारे तिकिटांचे पैसे भरता येतात. कंपनीद्वारे मोफत कॅन्सलेशन, रिफंड्स आणि प्रवास विम्यासह विनाअडथळा प्रवास अनुभव पुरविला जातो.