लोक स्मार्टफोनपेक्षा लॅपटॉप वापरत असताना वैयक्तिक फायद्यासाठी खोटे बोलण्यास अधिक इच्छुक असतात, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॉनफ्लिक्ट मॅनेजमेंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात संशोधनकर्त्यांनी काही उपक्रम केले. या उपक्रमातून वरील माहिती समोर आली आहे.

पहिला उपक्रम हा ‘घ्या किंवा सोडून द्या’ असा होता. यातील सहभागीला १२ डॉलर्स मिळणार होते. सहभागीला सांगण्यात आले की त्याला १२ डॉलर्स मिळतील, पण यातील काही रक्कम त्याला त्यांच्या भागिदाराशी वाटून घ्यावी लागेल. त्याने निवडलेली कोणतीही रक्कम त्याला सांगण्याची मुभा होती. संपूर्ण रक्कम सांगून वाटणी त्याला करता येत होती किंवा छोटी रक्कम सांगून मोठी त्याला त्याच्या जवळ ठेवता येऊ शकत होती. परंतु, दोघांनाही पैसे मिळण्यासाठी भागिदाराने ऑफर मान्य करणे गरजेचे होते.

(Diabetes : आता स्वस्तात मिळणार मधुमेहावरील ‘ही’ औषध, किंमत केवळ ६० रुपये, कुठे मिळणार जाणून घ्या..)

आपल्या भागिदाराल ही बाब कळवण्यासाठी अर्ध्या सहभागींनी लॅपटॉपचा वापर केला तर बाकीच्यांनी स्मार्टफोन्सचा वापर केला. यातून संशोधनकर्त्यांना असे दिसून आले की, लॅपटॉपचा वापर करमणारे लोक ८२ टक्के खोटे बोलण्यासाठी इच्छुक होते, तर केवळ ६२ टक्के फोन वापरकर्त्यांनी सरासरी इतके खोटे बोलणे पसंत केले.

दुसरा चाचणी वाटाघाटीची होती. यात दोन लोकांना त्यांच्यापैकी एकाच्या मालकीच्या एका आभासी सेमी कंडक्टर कारखान्याच्या किंमतीवर देवाणघेवाण करण्यास सांगण्यात आले. संशोधकांनी २२२ विद्यार्थ्यांना खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये विभाजित केले. कारखान्याचे बाजार मुल्य जवळपास २१ दशलक्ष डॉलर असल्याचे सांगण्यात आले. नंतर, खरेदीदारांना विक्रेत्यांकडून मालमत्तेची वाजवी किंमत विचारण्यात आली तसेच सुरुवातील एक ऑफर देण्यात आली. मागील प्रयोगाप्रमाणेच अर्ध्या लोकांनी लॅपटॉप वापरणे निवडले तर उर्वरित अर्ध्या लोकांनी स्मार्टफोन निवडले. या चाचणीतही तेच निष्कर्ष निघालेत.

(उवांशिवाय ‘या’ ५ कारणांमुळे दखील डोक्यात खाज येऊ शकते, करा हे उपाय)

लॅपटॉवरून संवाद साधणाऱ्या खरेदीदारांनी विक्रेत्यांना बाजार मुल्य १६.७ दशलक्ष असल्याचे सांगितले, जे मोबाईलच्या तुलनेत कमी होते. मोबाइल वापरकर्त्यांनी १८.१ मिलीयन हे बाजार मुल्य सांगितले जे अधिक होते. अशा प्रकारे संशोधकांनी तिसरी चाचणी देखील घेतली.

संशोधक नोंदवले हे निरीक्षण

यावर संशोधकांनी आपले निरीक्षण नोंदवले. मागील चाचणींमध्ये लोक समोरासमोर बोलण्याच्या तुलनेत व्हर्च्युअली संवाद करत असताना अधिक खोटे बोलत असल्याचे आम्हाला आढळले. वास्तविक जीवनात वर्तन कसे घडेल याबाबत आमचे आभ्यास अचूकपणे सांगू शकत नाही, परंतु हे प्रयोग तंत्रज्ञान मानवी वर्तन कसे बदलू शकते याचे पुरावे देतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले.

आमच्या प्रयोगांमध्ये इतर घटक जसे विविध स्क्रिनचे आकार, किंवा स्थान लोकांच्या खोटे बोलण्याच्या निवडीवर परिणाम करत असतील. पण तंत्रज्ञानाचे दैनंदिन निर्णयांवर होणारे परिणाम तपासणे गरजेचे असल्याचे आमचे संशोधन सांगते, असे संशोधक म्हणाले.

Story img Loader