तुम्ही अद्याप तुमचे रिटर्न भरले नसेल, तर ते लवकरच भरा. कारण आयटीआर भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. प्रत्येक वर्षातील हा काळ असा असतो की जेव्हा सर्व करदाते आपले आयटीआर रिटर्न्स (ITR) भरण्यासाठी त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचे आणि पैशांचे मूल्यांकन करण्यात व्यस्त असतात. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठी ITR भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै आहे. ३१ जुलैच्या पुढे ही मुदत वाढवली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. टॅक्स भरण्यासाठी भारतीय डिजिटल पेमेंट कंपनी Phone Pe ने त्यांच्या App वर ‘Income Tax Payment’ हे फिचर लॉन्च केले आहे.
फोन पे ने लॉन्च केलेले हे फिचर करदात्यांना आणि व्यावसायिकांना थेट फोन पे मधून self-assessment आणि अॅडव्हान्स टॅक्स भरता येणार आहे. फोन पे ने सांगितल्याप्रमाणे या फीचरमुळे करदात्यांना सोपे होणार आहे. यामुळे टॅक्स पोर्टलवर लॉग इन करण्याची गरज निर्माण होणार नाही. हे फिचर अधिक सक्षम करण्यासाठी फोन पे ने PayMate, डिजिटल B2B पेमेंट आणि सेवा प्रदाता सह भागीदारी केली आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
हेही वाचा : चिमणी उडाली भुर्रर्र, Elon Musk यांनी बदलला ट्विटरचा लोगो; नवा लोगो पाहिलात का?
फोन पे ने सोमवारी आपले नवीन फिचर लॉन्च केले. ज्यामुळे वापरकर्ता आपल्या क्रेडिट कार्ड किंवा UPI चा वापर करून सोप्या पद्धतीने आपला टॅक्स भरू शकतात. ही सुविधा क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी अतिरिक्त फायद्यांसह येते. कारण यामध्ये वापरकर्ते ४५ दिवसांच्या व्याज मुक्त कालावधीचा आनंद घेऊ शकतात. तसेच त्यांच्या संबंधित बँकाच्या आधारे त्यांच्या कर पेमेंटवर रिवॉर्ड पॉईंट देखील मिळवू शकतात.
महत्वाची गोष्ट म्हणजे फोन पे च्या फीचरद्वारे करदाते फक्त कर भरू शकतात. मात्र ते फाईल करू शकत नाहीत. त्यामुळे आयटीआर फाईल करण्यासाठी वापरकर्त्यांना दिलेल्या तपशिलाचे पालन करावे लागेल.
हेही वाचा : UPI Lite अॅपमधून पिनशिवाय करता येणार पेमेंट; Google Pay मध्ये कसे वापरायचे? जाणून घ्या
फोन पे मधील बिल पेमेंट्स आणि रिचार्ज बिझनेसच्या प्रमुख निहारिका सैगल म्हणाल्या, “PhonePe वर, आम्ही वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या ऑफरमध्ये प्रगती करण्यासाठी वचनबद्ध आहोत.फिचर फोन पे अॅपवरच टॅक्स भरण्याची सुविधा लॉन्च करताना आम्हाला आनंद होत आहे. टॅक्स भरणे बऱ्याचदा कठीण आणि वेळखाऊ काम असू शकते. तसेच फोन पे आता आपल्या वापरकर्त्यांना त्यांच्या कर दायित्वांची पूर्तता करण्यासाठी एक त्रास-मुक्त आणि सुरक्षित मार्ग ऑफर करत आहे. आमचा विश्वास आहे की यामुळे आमचे वापरकर्ते कर भरण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणतील कारण आम्ही आता प्रक्रिया सोपी आणि सोपी केली आहे.”