डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असणाऱ्या PhonePe ने आपले UPI Lite हे फिचर आजपासून सर्वांसाठी सुरु केले आहे. हे सर्व परमौख बँकांद्वारे समर्थित फिचर असून देशभरातील सर्व व्यपाऱ्यांकडे UPI आणि QR स्वीकारले जाते. ही सुविधा ‘ऑन-डिव्हाइस’ बॅलन्सद्वारे चालते ज्यामध्ये कमी किंमतीच्या व्यवहारांसाठी अतिशय वेगवान रिअल टाइम पेमेंटची सुविधा देते.
भारत सरकारने UPI सिस्टीम सुरू केल्यापासून भारतात ऑनलाईन व्यवहार वाढत आहेत. UPI आधारित अनेक Apps गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. फोन पे हे एक UPI आधारित अॅप आहे. UPI ही सेवा NPCI द्वारे ऑपरेट केली जाते. बँकिंग सेवेसाठी UPI System चा वापर केला जातो. UPI चा वापर करणे अगदी सुरक्षित आहे. त्यामुळे आपण अनेक ऑनलाईन पेमेंट करू शकतो. फोन पे अॅप ज्याला तुम्ही मोबाइल वॉलेट देखील म्हणू शकता. कारण या अॅपच्या मदतीने तुम्ही मोबाइल रिचार्ज, मोबाइल बिल, गॅस बिल, वीज बिल, डिश रिचार्ज, मनी ट्रान्सफर, ऑनलाइन शॉपिंग, फास्टटॅग खरेदी करणे इत्यादी करू शकता.
हेही वाचा : Cognizant Layoff: कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढले; आता ‘इतक्या’ लोकांची जाणार नोकरी, कारण…
UPI LITE हे फीचर वापरकर्त्यांना कमी किंमतीचे पेमेंट करण्याची परवानगी देते. वापरकर्ते या फीचरच्या माध्यमातून २०० रुपयांपर्यंतचे पेमेंट पिन न टाकता देखील एका क्लिकवर करू शकणार आहेत. हे नियमित UPI व्यवहारांपेक्षा अधिक सोपे आणि वेगवान व्यवहार करते. UPI Lite अकाउंट वापरकर्ते फोन पे App वर सोप्या प्रक्रियेने Activate करू शकतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारची केवायसीची आवश्यकता लागत नाही. वापरकर्ते त्यांच्या UPI Lite या अकाउंटमध्ये २००० रुपये अॅड करू शकतात. तसेच एकावेळी २०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीचे व्यवहार करू शकतात.
यूपीआय लाईटवरून वापरकर्त्यांनी एका दिवसात किती व्यवहार केले त्याबद्दल एक एसएमएस दररोज प्राप्त होणार आहे. ज्यामध्ये त्यांनी बँकेच्या माध्यमातून दिसभरामध्ये केलेल्या UPI Lite व्यवहारी हिस्ट्री दिसणार आहे.
PhonePe चे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी राहुल चारी म्हणाले, ”UPI LITE हा UPI स्टॅक ऑफरचा एक मुख्य भाग आहे. ज्याचा उद्देश वापरकर्त्यांचा डिजिटल पेमेंट करण्याचा अनुभव वाढवणे हा आहे. UPI Lite सध्या असलेल्या UPI च्या पायाभूत सुविधांवर दबाव न आणता त्यांना वेगवान आणि सोपे करेल.