Upi Payments : हल्ली पानटपरी, फेरीवाल्याची गाडीर, चहाचा स्टॉल, मोठ्या हॉटेलपासून स्टेशनरीच्या दुकानांपर्यंत सगळीकडे यूपीआय व्यवहार केले जात आहेत. कुठेही काहीही खरेदी करा? ग्राहक दुकानदाराकडे स्कॅनर कोड मागतात. विविध यूपीआय कंपन्यांनी दुकानदारांना कोडसाठी छानसे कार्ड बनवून दिलेली आहेत.
पेमेंटसाठी UPI Apps चा वापर सातत्याने वाढत आहे. भारतात बहुतेक लोकं पेमेंटसाठी पेटीएम, फोन पे, गुगल पे इत्यादी वापरतात. UPI द्वारे केलेल्या एकूण व्यवहारांपैकी सुमारे ५० टक्के व्यवहार फोन पेद्वारे केले जातात.
दरम्यान , PhonePe ने Pincode नावाचे नवीन App लॉन्च केले आहे. ओएनजीसीचा एक भाग आहे. ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स हा सरकारने सुरू केलेला एक उपक्रम आहे जिथे वस्तू आणि सेवांची डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक नेटवर्कवर देवाणघेवाण केली जाऊ शकते. म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणाहून कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइट किंवा प्लॅटफॉर्मवरून सामान खरेदी किंवा विक्री करू शकता. परंतु वेबसाइट देखील ONDC चा एक भाग आहे.
सध्या कंपनीने हे नवीन App सध्या बंगळुरूमध्ये सुरु करण्यात आले आहे. या App च्या माध्यमातून लोक सुरुवातीला किराणा, औषधे आणि खाद्यपदार्थ ऑर्डर करू शकतील. म्हणजेच आता तुम्हाला शेजारील दुकानातूनसुद्धा ऑनलाइन स्वरूपात सामान मंगवता येणार आहे. कंपनीने म्हटले आहे की ते हळूहळू इतर शहरांमध्येही हे अॅप्लिकेशन सुरू करणार असून या वर्षाच्या अखेरीस दररोज १ लाख ऑर्डर घेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा : G-Pay, PayTM, PhonePe ॲपवरील व्यवहारांना अतिरिक्त ‘चार्ज’ लागणार?
सध्या फोनपे ई-कॉमर्स विभागात switch सह काम करते. अनेक महत्त्वाच्या सेवा ग्राहकांना हॉटेल, प्रवास बुकिंग इत्यादीसारख्या अनेक सेवा देते. तुम्ही गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून फोनपेचे नवीन अॅप ‘पिनकोड’ डाउनलोड करू शकता.