Phone Pe Marathi Voice Notification: आजकालच्या काळामध्ये डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्ये डिजिटल पेमेंटसाठी गुगल पे, फोन पे आणि पेटीएम आणि अन्य अॅप्सचा वापर केला जातो. त्यातीलच एक अॅप असणाऱ्या फोन-पे ने एक मोठा निर्णय घेतला आहे. फोन पे स्मार्ट स्पीकर आता लवकरच पेमेंट आवाजाची सूचना मराठी भाषेमध्ये लॉन्च करणार आहे. म्हणजेच आता पेमेंट झाल्यावर स्पीकरमधून मराठी भाषेत आवाज ऐकू येणार आहे.
फोन-पे ने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे. पेमेंट पूर्ण झाल्यावर स्पीकरमधून येणार आवाजाच्या सूचनेसाठी मराठी भाषा जोडण्याशिवाय राज्यातील व्यापारी आता त्यांच्या आवडत्या भाषेत बिझनेस अॅपसाठी फोन पे मध्ये स्मार्ट स्पीकर ॲक्सेस करू शकणार आहेत.
हेही वाचा : Noise ने लॉन्च केले महिलांसाठी ‘हे’ स्पेशल स्मार्टवॉच; लुक देखील एकदम जबरदस्त
आता व्यापारी मराठी भाषेमध्ये ग्राहकांचे पेमेंट झालेले लगेच ओळखू शकतात. तसेच त्यांना गर्दीच्या वेळेत ग्राहकांनी केल्ले पेमेंट तपासण्यासाठी ग्राहकांच्या फोनवर पाहण्याची गरज भासणार नाही. तसेच बॅंकेच्या मेसेजची देखील वाट पहावी लागणार नाही. फारच कमी कालावधीमध्ये डिव्हाइसला व्यापाऱ्यांकडून फोन पे अभूतपूर्व अभिप्राय मिळाले आहेत. याचाच परिणाम शहरी आणि ग्रामीण बाजारामध्ये फोन पे च्या स्मार्ट स्पीकरच्या मागणीत वाढ झाली आहे.
फोन पे सध्या देशातील १९ हजार पिनकोड म्हणजेच ९० टक्के प्रदेश कव्हर करते. ज्यामध्ये व्यापाऱ्यांकडून फोन पे स्मार्ट स्पीकरचा वापर केला जातो. दुकानांमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी ग्राहकांनी केलेल्या पेमेंटला ट्रॅक करण्यासाठी विश्वसनीय आणि सुलभ उपाय म्हणून कंपनीने गेल्या वर्षी स्मार्ट स्पीकर लॉन्च केले होते. काही वैशिष्ट्ये जे फोनपे स्मार्ट स्पीकरला बाजारात इतर उत्पादनांपेक्षा वेगळे ठरवते त्यात समावेश आहे, त्याची पोर्टेबिलिटी, श्रेणीतील सर्वोत्तम बॅटरी, सर्वात जास्त गोंगाटाच्या ठिकाणीसुद्धा आवाजातील उत्तम स्पष्टता, आणि त्याचे कॉम्पॅक्ट आणि सुटसुटीत स्वरूप ज्यामुळे व्यापारी स्पीकरला दाटीवाटीच्या ठिकाणी कुठेही अगदी छोट्याशा जागी सुद्धा ठेवून वापरू शकतात.
फिचर फोनचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांना पेमेंट झाले की नाही याची खात्री करण्यासाठी मोबाइलवर येणाऱ्या SMS वर अवलंबून रहावे लागत होते. मात्र फोन पे च्या स्मार्ट स्पीकरमुळे व्यापाऱ्यांचे हे काम अधिक सोपे झाले आहे. या स्पीकरचे एकदा चार्जिंग केल्यास त्याची बॅटरी ४ दिवस टिकते. डेटा कनेक्टिव्हीटी, बॅटरीचा किती वापर झाला यासाठी वेगवगेळे LED इंडिकेटर, बॅटरीचे चार्जिंग संपत आल्यास त्याच आवाजामध्ये मिळणारी सूचना आणि पेमेंट पुन्हा ऐकण्यासाठी त्यात रिप्ले बटण अशी काही फीचर्स यामध्ये मिळतात.