Apple ही मोबाईल उत्पादन करणारी एक मोठी कंपनी आहे. या शिवाय ही कंपनी एअरपॉड्स,लॅपटॉप, मॅकबुक आणि अन्य प्रॉडक्ट्सचे उत्पादन देखील करते. याच कंपनीबाबत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मोठे विधान केले आहे. हे विधान नक्की काय आहेत ते आपण जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ‍ॅपल कंपनी भारतातील आपले उत्पादन वाढवण्याचा विचार करत आहे असे पियुष गोयल म्हणाले. एका मीडियाच्या रिपोर्टनुसार सोमवारी उद्योग संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) द्वारे आयोजित बी२० इंडियाच्या उदघाटनाच्या वेळी पियुष गोयल बोलत होते.भारतात व्यवसायासाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे अनेक जागतिक कंपन्या त्याचा व्यवसाय इथे उभा करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी रांग लावून उभे आहेत. या कंपन्यांना देशात व्यवसाय उभारण्यासाठी मदत करण्यात येत आहे असे पियुष गोयल म्हणाले.

हेही वाचा : लवकरच भारतात लाँच होणार 108 मेगापिक्सलचा जबरदस्त कॅमेरा असणारा Oppo चा ‘हा’ स्मार्टफोन

अ‍ॅपल कंपनी भारतात आधीपासून आपले उत्पादन करत आहे. सध्या ही कंपनी भारतातील एकूण उत्पादनापैकी ५ ते ७ टक्के एवढे उत्पादन करते. जर मी चुकत नसेन तर, भारतात त्यांचे उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे त्यांचे टार्गेट आहे. त्यांची त्यांची काही नवीन मॉडेल्स ही भारतामधूनच लाँच केली आहेत.

भारतातातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली आहे. कंपन्यांसाठी सरकारी धोरणे आणि बिझनेस मॉडेल यांच्यात पारदर्शकता आणण्यात आली आहे. असे पियुष गोयल म्हणाले. भारतात आयफोनचे उत्पादन फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन सारख्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांद्वारे केले जात आहे. हे वर्ष संपूर्ण जगासाठी आव्हानातम्क असणार आहे असे गोयल म्हणाले. अनेक देशांमध्ये महागाईचे प्रमाण खूप जास्त आहे पण भारतातील किंमती नियंत्रणात आहेत.

हेही वाचा : …म्हणून Googleने भारतीय हॅकर्सना दिले चक्क १८ लाखांचे बक्षीस; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, अ‍ॅपलचे सर्वात मोठे युनिट हे कर्नाटक राज्यातील बेंगळुरुजवळील होसूर येथे बांधण्यात येणार आहे. ज्यामुळे सुमारे ६०,००० लोकांना रोजगार मिळू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Piyush goyal said target apple company to increase production india to 25 percent tmb 01