नवीन वर्ष सुरू होण्यास फक्त एकच दिवस शिल्लक आहे. हे नवीन वर्ष उत्साहात साजरे करण्यासाठी अनेक जण फिरायला जायचा प्लॅन करतात; तर यादरम्यान आपत्कालीन परिस्थिती प्रवाशांवर येऊ शकते. अशा वेळी मदत करण्यासाठी सोप्या गोष्टी किंवा काही बदल आहेत, जे तुम्ही प्रवास करण्यापूर्वी तुमच्या स्मार्टफोनवर करणे आवश्यक आहे. तर प्रवास करताना तुमच्या फोनमध्ये कोणत्या दहा गोष्टी असणे अत्यंत महत्वाचे आहे हे पाहू.

तुमच्या फोनमध्ये पुढीलप्रमाणे काही बदल करा :

star pravah mi honar superstar chhote ustaad season 3 show winner
मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद ३ : यवतमाळची गीत बागडे ठरली महाविजेती! मिळालं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Aai Baba Retired hot ahet Marathi Serial entertainment news
आईला निरोप आणि आईबाबांचे स्वागत…

१. इमर्जन्सी अलर्ट ऑन ठेवा (Turn on Emergency alerts) :
तुम्ही दूर कुठेतरी जात असाल किंवा नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकतील अशा ठिकाणी जात असाल, तर तुमच्या फोनवरील आपत्कालीन प्रसारण (इमर्जन्सी अलर्ट ) चालू करा. हे तुम्हाला नैसर्गिक आपत्तींबद्दल चेतावणी देतील, ज्यामध्ये हवामान परिस्थितीचासुद्धा समावेश असेल.

२. वैद्यकीय माहिती किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींचे फोन नंबर स्क्रीनवर ठेवा (Keep emergency info on your phone) :

तुमची वैद्यकीय माहिती आणि जवळच्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट नंबर फोनच्या लॉक स्क्रीनवर ठेवा. हे संकटाच्या काळात अधिक चांगल्या प्रकारे मदत करण्यास आणि काही झाल्यास तुमच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यास मदत करेल. Android वापरकर्त्यांनी यासाठी सेटिंग्जमध्ये जा, मग अबाउट (About ) वर क्लिक करा. इमर्जन्सी इन्फॉर्मेशनवर जा आणि तिथे नंबर आणि वैद्यकीय माहिती नमूद करा. तसेच आयफोनवर वैद्यकीय माहिती नमूद करण्यासाठी हेल्थ ॲप वापरा.

३. महत्त्वाचे संपर्क जतन करा :

तुम्ही जिथे फिरायला गेला आहात तेथील स्थानिक अधिकारी, हॉटेल आणि इतरांचे संपर्क तुमच्या फोनमध्ये जतन करा.

४. ऑफलाइन नकाशे डाउनलोड करा :

तुम्ही कारने प्रवास करत असाल, ट्रेकिंग करत असाल, तर गुगल मॅप्स वापरून तुमच्या फोनवर ऑफलाइन नकाशे डाउनलोड करा. अशा प्रकारे तुम्ही इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवायही रस्ता शोधू शकता.

५. महत्त्वाच्या वैयक्तिक कागदपत्रांच्या डिजिटल प्रती तुमच्या फोनमध्ये ठेवा (Keep digital copies of important personal documents on your phone) :

महत्त्वाच्या कागदपत्रांच्या डिजिटल प्रती नेहमी तुमच्या फोनवर ठेवा. तुम्ही डिजिलॉकरसारखे ॲप डाउनलोड करून त्यात तुमच्या कागदपत्रांचे फोटो सुरक्षितपणे ठेवू शकता. तुम्ही पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिड कार्ड आदी ओळख पुरावे तुमच्याबरोबर ठेवा.

हेही वाचा…UPI ​​युजर्ससाठी येणार खास फीचर; एका टचमध्ये होणार झटपट व्यवहार…

६. युपीआय ॲप Enable करा (Enable UPI-based apps) :

प्रवासादरम्यान तुमच्या फोनमध्ये युपीआय ॲप्स किंवा इतर वॉलेट-आधारित पेमेंट ॲप्स डाउनलोड करून ठेवा. कारण, तुमचे वॉलेट हरवले तर हे ॲप्स उपयोगी पडू शकतात.

७. तुमच्या क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती नोट्समध्ये लिहा (Keep card details saved in notes) :

ऑनलाइन पेमेंटसाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तपशील तुमच्या फोनवर सेव्ह करा. सॅमसंगसारखे काही स्मार्टफोन तुम्हाला पेमेंट ॲप्समध्ये कार्ड जोडण्याची परवानगी देतात.

८. तुमच्या फोनसाठी माय सर्व्हिस Enable करा (Enable Find My service for your phone) :

आयफोनवर फाईंड माय किंवा अँड्रॉइड डिव्हाइसेसवर फाईंड माय फोन Enable करून तुमचा फोन सुरक्षित ठेवा. तुमचा फोन हरवल्यास हे तुम्हाला फोन ट्रॅक करण्यात मदत करते.

९. तुमच्या फोनमध्ये भाषांतर ॲप डाउनलोड करा (Get translation app on your phone) :

इतर देशात प्रवास करताना तेथील भाषा समजणे थोडे कठीण जाते. तर गुगल भाषांतर किंवा इतर भाषांतर ॲप्स तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून ठेवा. कारण, हे ॲप्स तुम्हाला लोकांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्यात मदत करू शकते. हे ॲप्स फोटो आधारित भाषांतर फिचर्सनादेखील समर्थन देतात.

१०. रोमिंग फिचर Enable करा :

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रवास करताना डेटा वापरता यावा यासाठी फोनवरील रोमिंग सेवा Enable करा.